बॉलिवूडमध्ये दरवर्षी ईदला जबरदस्त पार्टी केली जाते. दरम्यान कोरोनामुळे पूर्वीप्रमाणे ईद साजरी होऊ शकली नाही. मात्र सलमान खानपासून (Salman Khan) ते शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ईद पार्टीची दरवर्षी चर्चा होते. प्रत्येक ईदला चाहते सलमान खान आणि शाहरुख खानच्या घराबाहेर तासनतास त्यांच्या एका झलकसाठी उभे असतात. यावर्षी देखील असाच काहीसा नजारा पाहायला मिळाला.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी हा दिवस त्याच्या चाहत्यांसाठी खास बनवतो. सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर हजारो लोक जमतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्याने ईदच्या निमित्ताने त्याच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (on eid 2022 shahrukh khan and salman khan greets their fans who gathered outside their home)
वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या घराबाहेर सलमान खानचे हजारो चाहते जमले होते. सलमानची एक झलक पाहण्यासाठी हे चाहते तासन्तास त्याच्या घराबाहेर उभे होते. सलमान खानला पाहताच त्याच्या चाहत्यांनी सल्लू-सल्लू असा आरडाओरडा सुरू केला. चाहत्यांना पाहून सलमाननेही हात जोडून नमस्कार केला. यावेळी अभिनेता निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला.
दुसरीकडे, ईदच्या निमित्ताने शाहरुख खाननेही चाहत्यांना ईदी दिली आहे. त्याने बाल्कनीत येऊन चाहत्यांची भेट घेतली. शाहरुख खानच्या चाहत्यांना मन्नतच्या बाल्कनीत त्यांचा चंद्र पाहायला मिळाला! शाहरुख खानने मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तब्बल दोन वर्षांनंतर शाहरुख बाल्कनीत अशा प्रकारे चाहत्यांना भेटला आहे. त्याने चाहत्यांसोबतचा सेल्फीही सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये शाहरुखच्या घराबाहेर हजारो चाहते जमलेले दिसत आहेत. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते आसुसले होते. चाहत्यांची ही इच्छा आज शाहरुखने पूर्ण केली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान लवकरच ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘पठाण’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










