मनोरंजनविश्वातील अनेक अभिनेत्री या त्यांच्या अभिनयापेक्षा अधिक त्यांच्या बोल्डनेसमुळे ओळखल्या जातात. तसे पाहिले तर हिंदी अभिनेत्रींपेक्षा भोजपुरी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अधिक बोल्ड असतात. त्या पडद्यावरच काय तर रियल लाईफमध्ये देखील हिंदी अभिनेत्रींना पछाडत मादकता दाखवतात. सध्याच्या घडीला भोजपुरी इंडस्ट्रीमधील तुफान गाजणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता मल्ल्या. आपल्या मादक सौंदर्यामुळे आणि घायाळ करणाऱ्या अदांमुळे नम्रता सतत चर्चांमध्ये येत असते.
नम्रता मल्ल्याचे सोशल मीडिया अकाऊंट उघडून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ती ग्लॅमरस आणि मादक आहे. नम्रता सतत तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे अनेक बोल्ड फोटो शेअर करत लाइमलाईट्मधे येत असते. एका रात्रीत स्टार झालेल्या कलाकारांपैकी एक म्हणून नम्रताचे नाव घेतले जाते. आपल्या सिझलिंग अवतारामुळे सतत गाजणाऱ्या नम्रतेने पुन्हा एकदा तिचे जलवे दाखवत सोशल मीडियावर आग लावली आहे.
खेसारी लाल यादवच्या ‘दो घुंट’ गाण्यात झळकलेल्या नम्रताने नुकतेच तिचे काही बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समुद्रात लाटांमध्ये पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या टूपीस बिकिनीमध्ये नम्रता कमालीची आकर्षक दिसत आहे. या फोटोंमध्ये तिच्या लक्षवेधी पोज सर्वांनाच तिची दखल घेण्यासाठी भाग पाडत आहे. या बिकिनीवर नम्रताने न्यूड मेकअप केला असून, त्यावर कानात मोठमोठे कानातले आणि तिची नोज रिंग तिच्या लुकला पूर्ण करत आहे.
भोजपुरी इंडस्ट्री गाजवणारी नम्रता लवकरच साऊथमध्ये देखील तिच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार आहे. तेलगू सिनेमात ती लवकरच एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा