Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

वयाच्या साठीत चित्रपटाच्या नायिकेसोबत राम गोपाल वर्मा यांचे बोल्ड फोटो झाले व्हायरल

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma)  त्याच्या चित्रपटांसोबतच बोल्ड कंटेंट आणि जीवनशैलीमुळे चर्चेत राहत असतो. त्याचे अनेक वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राम गोपाल वर्माचे काही ताजे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या फोटोआणि व्हिडिओंमध्ये, चित्रपट निर्माता एका सुंदर महिलेसोबत दिसत आहे. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ.

सध्या चित्रपट निर्माता राम गोपाल वर्माचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये राम गोपाल वर्मासोबत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे अप्सरा. अप्सरा राम गोपाल वर्मा यांच्या ‘खतरा: डेंजरस’ या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने एकापेक्षा एक बोल्ड सीन चित्रित केले आहेत. या चित्रपटानंतर तिचे सोशल मीडियावर फॉलोअर्सही खूप वाढले आहेत. राम गोपाल वर्मा यांचे वय ६० वर्षे आहे.यासह, जर राम गोपाल वर्मा आणि अप्सरा या दोघांच्याही इन्स्टाग्रामवर नजर टाकली, तर संपूर्ण एकापेक्षा एक बोल्ड  आणि दोघांच्या अप्रतिम फोटोंनी भरलेले आहे.

फोटोंमध्ये राम गोपाल वर्मा कधी अप्सरासोबत पार्टी करताना तर कधी तिला फुलांचे गुच्छ देताना दिसत आहे. यासोबतच दोघांनी एकत्र काही हॉट फोटोशूटही केले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते या जोडीला कमेंट सेक्शनमध्ये ‘ब्युटी अँड द बीस्ट’ म्हणत जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात.त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची वाट पाहत आहेत. भारतात पहिल्यांदाच एका लेस्बियन प्रेमकथेवर बनलेला राम गोपाल वर्माचा सर्वात वादग्रस्त चित्रपट ‘खतरा : डेंजरस’ अखेर 8 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. नयना गांगुली आणि अप्सरा या राम गोपाल वर्माच्या या चित्रपटाचा भाग होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा