बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘धाकड’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये कंगनाचे जबरदस्त ऍक्शन सीन पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत असून, ती बरीच तोडफोड करताना दिसत आहे. कंगनाचा लूकही खूपच आकर्षक आहे, जो प्रेक्षकांना हॉलिवूड चित्रपटांची आठवण करून देतोय. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या ऍक्शन सीन्सची तुलना हॉलिवूड चित्रपटांशी केली आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाहीये की, बॉलिवूड अभिनेत्रीने चित्रपटातील तिच्या ऍक्शन सीनसाठी वाहवा मिळवली आहे. कंगना व्यतिरिक्त कोणकोणत्या अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये ऍक्शन करून सर्वांना दंग केले, ते या लेखात पाहूया… (from katrina kaif to priyanka chopra these actresses played action scene in films)
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची एक अष्टपैलू अभिनेत्री आहे, जी सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तिने २०१४ साली रिलीझ झालेल्या ‘मेरी कॉम’ चित्रपटात जबरदस्त ऍक्शन सीन्स दिले होते. हा चित्रपट बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित होता, ज्यामध्ये प्रियांका मेरी कोमच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय प्रियांकाने ‘जय गंगाजल’, ‘डॉन’, ‘डॉन २’, ‘द्रोण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ऍक्शन सीन करून वाहवा मिळवली आहे.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone)
दीपिका पदुकोण चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप छान साकारते. जबरदस्त कथेसह तिच्या चित्रपटांमध्ये प्रेम आणि रोमान्स जोडलेला पाहायला मिळतो परंतु दीपिकाने असेही काही चित्रपट केले आहेत, ज्यात तिला ऍक्शन सीन द्यावे लागले. दीपिका ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटांमध्ये ऍक्शन करताना दिसली आहे.
सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)
या यादीत सोनाक्षी सिन्हाच्या नावाचाही समावेश आहे. सोनाक्षीने तिच्या करिअरची सुरुवात ‘दबंग’ चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये ती एका साध्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. पण ‘अकिरा’ चित्रपटात सोनाक्षीने तिची साधी मुलगी ही इमेज तोडली. या चित्रपटात सोनाक्षीने जबरदस्त ऍक्शन सीन्स दिले होते. या चित्रपटात सोनाक्षीचे नाव अकिरा होते.
कॅटरिना कैफ (Katrina Kaif)
कॅटरिना कैफने बहुतेक असे चित्रपट केले आहेत, ज्यात लव्ह आणि कॉमेडीचा मसाला पाहायला मिळतो. पण ‘एक था टायगर’ या चित्रपटात कॅटरिनाने आपल्या जबरदस्त ऍक्शन सीन्सने सर्वांना चकित केले होते. या चित्रपटात कॅटरिनासोबत सलमान खान दिसला होता आणि दोघांचेही जबरदस्त ऍक्शन सीन्स पाहायला मिळाले.
तापसी पन्नू (Taaspee Pannu)
तापसी पन्नूने तिच्या काही चित्रपटांमध्ये ऍक्शन सीक्वेन्स देखील दिले आहेत, ज्यात ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’ यांचा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये तापसी खलनायकाला जबरदस्त पंच मारताना दिसली होती. तापसी केवळ बॉलिवूडमधीलच नाही, तर साऊथ चित्रपटातीलही मोठी अभिनेत्री आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










