Tuesday, June 6, 2023

‘सरबजीत’ चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण, प्रचंड मेहनत घेऊनही अभिनेत्याचे झाले नाही उचित कौतुक

आपला दमदार अभिनय आणि प्रत्येक भूमिकेसाठी घेतलेली जिवतोड मेहनत यामुळेच अभिनेता रणदीप हुड्डाला (Randeep Hudda) बॉलिवूड जगतातील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जाते. रणदीप हुड्डाने आपल्या अभिनयाने प्रत्येक चित्रपटात अभिनयाची कमाल दाखवली आहे. यामधलाच रणदीप हुड्डाचा गाजलेला चित्रपट म्हणजे सरबजित सिंग. या चित्रपटाची कथा आणि रणदीप हुड्डाची मेहनत वाखाणण्याजोगीच होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ६ वर्ष पूर्ण होत आहेत. पाहूया या चित्रपटाबद्दलच्या रंजक गोष्टी. 

दिग्दर्शक ओमंग कुमार यांच्या ‘सरबजीत’ चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. २०१६ मध्ये या चित्रपटाची कांस चित्रपट महोत्सवासाठी निवडही झाली होती. सरबजीत या व्यक्तीच्या जिवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता रणदिप हुड्डाने जबरदस्त काम केले होते. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र तरीही या कलाकाराचे म्हणावे तितके कौतुक झाले नाही.

सरबजीत हा एका सरदारावर आधारित चित्रपट होता ज्याने पाकिस्तानच्या जेलमध्ये २२ वर्ष घालवले होते. त्यांना पाकिस्तानमध्ये भारताचा एजेंट असल्याच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डाने चांगली भूमिका साकारली होती.  याबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, “तो कोणत्याही कौतुकाची किंवा पुरस्काराची अपेक्षा ठेवत नाही. तो त्याची भूमिका कशाप्रकारे सर्वोत्तम करता येईल याकडे लक्ष देतो.” तसेच सरबजीत चित्रपटाने त्याला अनेक मानसिक आणि शारिरीक इजा झाल्याचेही रणदीपने सांगितले होते. चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही महत्वाची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात असे अनेक सीन दाखवण्यात आले होते ज्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळलेले पाहायला मिळाले.खास करुन जेव्हा सरबजीतला जेलमध्ये असताना त्याचे कुटूंबिय भेटायला येतात. तो क्षण फारच भावूक झाला होता. चित्रपटात रणदीप हुड्डासोबत ऐश्वर्या राय आणि ऋचा चड्डानेही दमदार भूमिका साकारत सर्वांचेच लक्ष वेधले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा