Monday, June 23, 2025
Home अन्य पुढच्या महिन्यात होणार होते सिद्धू मूसेवालाचे लग्न, कॅनडामध्ये राहणाऱ्या मुलीसोबत झाला होता साखरपुडा

पुढच्या महिन्यात होणार होते सिद्धू मूसेवालाचे लग्न, कॅनडामध्ये राहणाऱ्या मुलीसोबत झाला होता साखरपुडा

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची नुकतीच निर्घृण हत्या करण्यात आली. दोन दिवस उलटूनही अद्याप या हत्येचे नेमके कारण समोर आले नाही. वयाच्या २८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या झालेल्या हत्येने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. मनोरंजनविश्वातून देखील या हत्येचा निषेध केला जात असून, सिद्धू मूसेवालासाठी न्याय मागितला जात आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर नुकताच एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. सिद्धू मूसेवालाचे लवकरच लग्न होणार होते.

सिद्धू मूसेवालाचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्याचा साखरपुडा संगरूरच्या संघरेडी गावातील एका तरुणीसोबत झाला होता. पंजाबमधील मोठ राजकीय पक्ष असलेल्या अकाली दलातील एका मोठ्या नेत्याच्या भाचीसोबत सिद्धू मूसेवालाचे लग्न ठरवण्यात आले होते. मुख्य म्हणजे सिद्धू मूसेवालाचे लग्न याचवर्षी सुरुवातील होणार होते, मात्र यावर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांची गर्दी असल्याने हे लग्न याचवर्षी मात्र काही महिन्याननंतर करण्यात येणार होते.

सिद्धू मूसेवालाने त्याचे रिलेशन आणि त्याची होणारी जोडीदार याबद्दल सर्वच माहिती अतिशय गुप्त ठेवली होती. सिद्धू मूसेवालासोबतच त्याच्या कुटुंबाने देखील ही बाब अतिशय गुप्त ठेवली होती. मात्र सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्या मुलीच्या गावातील लोकांनी याबद्दल माहिती दिली आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंजाबी मनोरंजनविश्वासह संपूर्ण देशातील लोकांना आणि त्याच्या फॅन्सला या हत्येमुळे मोठा धक्का बसला आहे.

केवळ २८ वर्षाचा पंजाबी गायक आणि कॉग्रेस पक्षाचा नेता म्हणून सिद्धू मूसेवालाने त्याची ओळख निर्माण केली होती. पंजाबमधील मनसा जिल्ह्यातील जवाहरके गावात २९ मे रोजी अज्ञात हमलावारानी सिद्धूवर गोळ्या झाडून त्याला मारले. या हल्ल्यामध्ये सिद्धूसोबत अन्य दोन जण देखील जखमी झाले आहेत. सिद्धू मूसेवालाच्या या अशा हत्येमुळे सर्वच लोकं स्तब्ध असून, त्याच्या लग्नाच्या आता आलेल्या या बातमीमुळे तर सर्वांना अधिकच त्रास होत आहे.

सिद्धू मूसेवालाचे लग्न संगरूरच्या संघरेड़ी गावातील अमनदीप कौरसोबत होणार होते. अमनदीप कौर ही कॅनडामध्ये राहत असून पीआरचे काम करत आहे. दोघांचा साखरपुडा दोन वर्षांपूर्वीच झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा