Sunday, June 22, 2025
Home टेलिव्हिजन ब्रेस्ट सर्जरीनंतर रेडिओथेरपी घेणाऱ्या छवी मित्तलला करावा लागतोय ‘या’ साईडइफेक्ट्सचा सामना

ब्रेस्ट सर्जरीनंतर रेडिओथेरपी घेणाऱ्या छवी मित्तलला करावा लागतोय ‘या’ साईडइफेक्ट्सचा सामना

टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलची काही दिवसांपूर्वीच ब्रेस्ट सर्जरी झाली. याबद्दल खुद्द छवीनेच सोशल मीडियावर माहिती दिली होती. आता या सर्जरीनंतर तिच्यावर रेडिओथेरपी सुरु झाली आहे. ही रेडिओथेरपी २० दिवसांपर्यंत चालणार असून याबद्दल छवीने माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या ऑपरेशनंतर छवी खुश असून सोशल मीडियावरून तिच्या तब्येतीचे अपडेट देत आहे. या एवढया आजारातही ती खुश असून, आनंदी राहण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे.

छवी मित्तलने तिच्यावर होणाऱ्या रेडिओथेरपीच्या साईडइफेक्ट्स बद्दल सांगितले आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी रोजप्रमाणे माझ्या रेडिओथेरपीचा डोज घेण्यासाठी जात आहे. मात्र स्वतःला बरे वाटावे यासाठी मी मलाच पकडून ठेवले आहे. मुंबईत असणाऱ्या खड्ड्यांमुळे मला त्रास होत आहे. हे खड्डे पाहून मला रेल्वे स्टेशनच्या बाहेर लिहिलेली पाटी आठवत आहे. ज्यावर लिहिले असते की, “कृपया यात्रिगण स्वतःच्या सामानाची स्वतः रक्षा करा.” कृपया माझ्या ट्युमरवर लक्ष देऊ नका.” यासोबत तिने तिचा एक गाडी बसलेला फोटो देखील शेअर केला आहे. ज्यात तिने तिचे ब्रेस्ट धरून ठेवले आहे.

छवीने अजून एका पोस्टमध्ये रेडिओथेरपीच्या साईडइफेक्टबद्दल लिहिले आहे. ब्रेस्ट सर्जरीनंतर तिच्या बॉडीमधले मोबिलिटी खूपच कमी झाले आहे. डॉक्टरांनी तिला जिममध्ये केवळ २ किलो वजन उचलण्यास सांगितले आहे. यासोबतच तिने सांगितले की, या थेरपीच्या वेळेस अंगावरील सर्व दागिने आणि घड्याळ काढून ठेवावे लागते. या रेडिएशन मशीनमध्ये गेल्यानंतर काही सेकंद आपला श्वास रोखून धरावा लागतो. तिने रेडिओ थेरपीचे पाच दिवस पूर्ण केले असून ही थेरपी झाल्यानंतर तिला दोन दिवस पूर्ण आराम देखील करावा लागतो. या थेरपीमुळे तिला खूप थकवा देखील येतो. यादरम्यान तिला गोड आणि डेयरी प्रोडक्ट्सपासून लांब राहायला सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा