Monday, April 13, 2026
Home मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या लाडक्या सुनेचे फोटो सोशल फोटोवर होतायेत व्हायरल, ‘या’ कार्यक्रमात झळकणार सासू-सुना

अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या लाडक्या सुनेचे फोटो सोशल फोटोवर होतायेत व्हायरल, ‘या’ कार्यक्रमात झळकणार सासू-सुना

निर्मिती सावंत (Nirmiti Sawant)  या मराठी सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मालिका,चित्रपट, नाटके अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच त्यांचे नाव मराठी चित्रपट जगतातील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत पहिल्यांदा घेतले जाते. विनोदी भूमिका असो किंवा खलनायकी पात्र असो प्रत्येक व्यक्तिरेखा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे निभावली हेच त्यांच्या अभिनयाची विशेष बाब आहे. सध्या त्या किचन कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

मराठी सिने जगतातील प्रतिभावान अभिनेत्रींच्या यादीत निर्मिती सावंत यांचे नाव घेतले जाते. कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक, हप्ताबंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर, अशा टिव्ही मालिकांमध्ये तर खबरदार, सासु नंबरी जावई दस नंबरी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय साकारला आहे. लवकरच त्या किचन कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सुनबाई म्हणजे पूर्वा पंडितही सहभागी होणार आहे. ज्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

निर्मिती सावंत यांचे पुत्र अभिनय सावंत यांनी पूर्वा पंडित यांच्याशी लग्न केले आहे. जी स्वतः एक कलाकार आहे. अभिनय सावंत एक अभिनेता आहे तर पूर्वा डुडल आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वाची स्वतःची एक कंपनी आहे. आपल्या उद्योगासोबतच ती सोशल मीडियावरही चांगलीच लोकप्रिय आहे. आपल्या कामांसंबधी, कुटूंबासोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. किचन कलाकार या कार्यक्रमात सासू सुना दोघीही हजेरी लावणार असल्याने प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाची जोरदार उत्सुकता लागली आहे.  आता या कार्यक्रमात सासूसुनेत कशी जुगलबंदी रंगणार हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

हे देखील वाचा