Thursday, June 26, 2025
Home टेलिव्हिजन साध्या, सोज्वळ अंगुरी भाभीच्या बोल्ड लूकने चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

साध्या, सोज्वळ अंगुरी भाभीच्या बोल्ड लूकने चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ या हिंदी मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तुफान विनोदी कथांमुळे ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. तिवारी जी असो किंवा हप्पु सिंग असो या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. परंतु मालिकेतील अंगुरी भाभीची साधी, अडाणी भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रेच्या (shubhangi atre) भूमिकेचे सर्वात जास्त कौतुक होत असते. शुभांगीची ही साधी सरळ भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून त्याला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर शुभांगी अत्रेचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. 

शुभांगी अत्रे ही छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. शुभांगी सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. ज्यावरुन ती आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रे सध्या मालदीवमध्ये खूप सुट्टीची मजा घेत आहे. सोशल मीडियावर ती सतत हे धमाल फोटो शेअर करत असते. मालदीवमध्ये पोहोचल्यावर तिने बिकिनीमधील तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. तिचा सिझलिंग अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत.

अंगूरी भाभीने पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. शुभांगीने पोस्टसोबत बीच इमोटिकॉन शेअर केला आहे. दुसऱ्या एका फोटोत शुभांगी अत्रे स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. या सुंदर फोटोत हातात शॅम्पेनचा ग्लास धरला आहे. हा फोटो शेअर करत शुभांगीने कॅप्शनमध्ये, “आपले मन समुद्रासारखे शांत ठेवा,” असे लिहले आहे. अंगूरी भाभी’चा हा अवतार पाहून चाहतेही वेडे झाले आहेत. सोशल मीडियावरील यूजर्स या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

हे देखील वाचा