Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड Shabaash Mithu | तापसी पन्नूच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, पाहून सचिन तेंडुलकरही झाला प्रभावित

Shabaash Mithu | तापसी पन्नूच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, पाहून सचिन तेंडुलकरही झाला प्रभावित

तापसी पन्नू (Taapsee Pannu) स्टारर ‘शाबाश मिठू’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिचा बायोपिक आहे. मिताली राजचा बालपणापासून ते क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता आणि आता याच्या ट्रेलरलाही खूप प्रेम मिळत आहे. आता अशातच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) ‘शाबास मिठू’च्या ट्रेलरसह मिताली राजच्या उत्कटतेचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे.

सचिन तेंडुलकरने क्रिकेटर सौरव गांगुलीने शेअर केलेल्या ‘शाबास मिठू’च्या ट्रेलरचा हवाला देत ट्वीट केले. स्तुती करताना त्याने लिहिले की, “शाबाश मिठूचा ट्रेलर खूपच हृदयस्पर्शी आहे. मितालीने लाखो लोकांना स्वप्न पाहण्यासाठी आणि आपल्या पॅशनचे अनुसरण करण्यासाठी प्रेरित केले आहे आणि मी हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे.” यासोबतच सचिनने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. (sachin tendulkar reaction shabaash mithu trailer)

आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मिताली राजच्या संघर्षाची कहाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आहे आणि मुख्य भूमिकेत तापसीचा अभिनयही खूप दमदार दिसत आहे. हा ट्रेलर दाखवतो की, तापसी पन्नू उर्फ ​​मिठूला पुरुष वर्चस्व असलेल्या खेळात, क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी सर्वत्र स्वतःसाठी कसे संघर्ष करावे लागते. परंतु ती हार मानत नाही आणि तिच्या उत्कटतेने स्वप्ने सत्यात उतरवते.

सृजित मुखर्जी दिग्दर्शित आणि वायकॉम१८ स्टुडिओज निर्मित ‘शाबाश मिठू’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट १५ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट केवळ मिताली राजच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष दाखवणार नाही, तसेच तिच्या २३ वर्षांच्या कारकिर्दीतील यश-अपयशांचे चढ-उतार दाखवणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा