Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड प्रियांका चोप्राचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून अचानक गायब! चिंतेत पडलेल्या चाहत्यांनी केलं ‘असं’ काही

प्रियांका चोप्राचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून अचानक गायब! चिंतेत पडलेल्या चाहत्यांनी केलं ‘असं’ काही

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर देशात राहत नसली, तरी आजही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत जोडलेली असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. पण आज अचानक जेव्हा चाहत्यांनी तिचे अकाऊंट सर्च केले, तेव्हा ‘नो रिझल्ट’ शो होऊ लागला, त्यानंतर चाहते चिंतेत पडले झाले आणि त्यांनी प्रियांकाच्या टीमशी संपर्क साधला.

चाहते पडले चिंतेत
प्रियांका चोप्रा तिच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसह शेअर करत असते आणि याच कारणामुळे भारतात अजूनही तिचे फॉलोव्हर्स खूप आहेत. आज सर्च करूनही प्रियांकाचे अकाऊंट इंस्टाग्रामवर दिसले नाही, तेव्हा युजर्सनी तिच्या अधिकृत सोशल टीम पीसीला याबाबत माहिती दिली आणि त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीचे अकाउंट, पोस्ट आणि व्हिडिओ लवकरात लवकर रिकव्हर करण्याची विनंती केली. (priyanka chopra instagram handle vanishes fans confused)

चाहत्यांनी साधला प्रियांका चोप्राच्या टीमशी संपर्क
प्रियांका चोप्रा स्वत:ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि तिने टीम पीसी नावाने एक टीम देखील हायर केली आहे. अभिनेत्रीच्या ‘मेरी कोम’च्या शूटच्या वेळचा एक थ्रोबॅक व्हिडिओ आज या अधिकृत खात्यावरून शेअर केला गेला. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत प्रियांकाचे अकाऊंट गायब झाल्याची माहिती दिली.

इथे पाहा ती पोस्ट

लवकरच रिकव्हर केले गेले अकाऊंट
प्रियांकाचे अकाऊंट गायब होताच, तिच्या टीमने ते रिकव्हर करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अभिनेत्रीच्या टीमच्या वतीने, तिचे अकाऊंट रिकव्हर केले जात असल्याची माहिती दिली गेली. दरम्यान, आता अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते आणि सर्व फोटो आणि व्हिडिओ देखील रिकव्हर करण्यात आले आहेत. मात्र, यामागचे कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा