Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरेरे! परिस्थिती लय वाईट, एकेकाळची विश्वसुंदरी परदेशातील हॉटेलात विकतेय भांडी

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही भारतीय सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. सध्या प्रियांकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती चक्क रस्त्यावर भांडी घासताना दिसत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य चला जाणून घेऊ. 

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा बिझनेस जगतातही चांगलीच लोकप्रिय झाली आहे. , नुकतेच तिने हेअर केअर प्रोडक्ट लाँच केले. त्यानंतर सोना आणि प्रियांका चोप्राने आपली संस्कृती देशभरात दाखवण्यासाठी होम वेअर लाँच केले आहे. ही माहिती प्रियांकाने  सोशल मीडियावर चाहत्यांना दिली. सध्या प्रियंका तिच्या खास स्टाइलच्या भांड्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अलीकडेच प्रियांकाने तिच्या या भांड्याच्या किंमतीही सांगितल्या आहेत ज्या ऐकून चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

प्रियांका चोप्राने नुकताच सोना होमवेअर ब्रँड लॉन्च केला आहे. यामध्ये तिने देशी शैलीतील भांड्यांचे डिझाईन तसेच टेबल क्लॉथ आणि स्टायलिश सजावटीच्या वस्तू साकारल्याचे दिसून येते. सोना होमवेअर तिच्या अनोख्या स्टाइलमुळे तसेच किमतींमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. सोना होमवेअर वेबसाइटनुसार, एका टेबल क्लॉथची किंमत 36,612 रुपये आहे. त्याच वेळी, मेणबत्ती स्टँडची किंमत सुमारे 5000 पासून सुरू होते. रुमाल सेटची किंमत 13 हजार आणि डायटरच्या प्लेटची किंमत 4,733 रुपये आहे. त्याच वेळी, सर्व्हिंग बाऊलची किंमत 7,732 रुपये आहे आणि कॉफी मगची किंमत 4000 हजारांपासून सुरू होते. प्रियांकाच्या या भांड्याची किंमती ऐकून चाहत्यांनीही डोळे विस्फारले आहेत.

 

दरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियांकाने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्रियांका चोप्राने २००० साली मिसवल्डचा किताबही पटकावला होता.

हेही वाचा- 

समंथा- नागाच्या नात्यात करण जोहरनं कालवलं विष? अभिनेत्रीने केलाय धक्कादायक खुलासा

कहरच! गरमीपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल, फोटो पाहून चाहत्यांच्याही डोळ्यावर बसेना विश्वास

Rocketry | चालू शकली नाही आर माधवनच्या ‘रॉकेट्री’ची जादू, ओपनिंग डेला केली केवळ ‘एवढी’ कमाई

हे देखील वाचा