Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड प्रेमिकेमुळेच ‘त्या’ सिनेमातनं झाली होता सैफची हाकालपट्टी

प्रेमिकेमुळेच ‘त्या’ सिनेमातनं झाली होता सैफची हाकालपट्टी

मंडळी प्रेम कधीही, कुठेही आणि कोणावरही होऊ शकते असं ऐकलं असेलच ना. खरंतर याच वाक्याला एका जोडीने खरं करून दाखवलं होतं, ती जोडी होती सैफ अली खान (saif ali khan) आणि अमृता सिंग (amruta singh) यांची. वयाचंही बंधन न बाळगता या दोघांनी संसारही थाटला होता. मात्र आता ही जोडी वेगळी होऊन बरीच वर्षे लोटली. पण तरीही या जोडीबद्दलचे किस्से आजही रंगवून सांगितले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की हे दोघं पहिल्यांदा भेटले कसे होते, तर मंडळी आपल्या व्हिडिओचा विषयच आहे की सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची पहिली भेट कशी झालेली आणि त्यानंतर काय झालेलं की त्याची इतकी चर्चा होते.

तर मंडळी गोष्ट आहे ९० च्या दशकाच्या दरम्यानची. त्यावेळी अमृता सिंगने तसं बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलेलं होतं. तिला बरेच जण ओळखतही होते. तिची दिग्दर्शक राहुल रवैल याच्याशीही चांगली मैत्री होती. तर झाले असं की राहुल एक चित्रपट करत होता, ज्याचं नाव होतं बेखुदी. त्याने त्यासाठी सैफ अली खान, काजोल यांना निवडलं होतं. त्यावेळी सैफ इंडस्ट्रीत येण्यासाठी झगडत होता. राहुलची त्या चित्रपटातील स्टारकास्टनं अमृताबरोबर फोटोशूट करावं ही इच्छा होती. तर मग अशी झाली अमृता आणि सैफ यांची पहिली भेट. पण झालं असं की अमृताला पाहाताच सैफची विकेट पडली. ते म्हणतात ना लव्ह ऍट फर्स्ट साईट तसंच काहीसं झालं सैफबरोबर.

सैफ अमृताला भेटण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याने अमृताला जेवायलाही बोलावलं होतं पण अमृताने ते टाळलं. तर अनेक रिपोर्ट्सनुसार अमृताने नंतर सैफलाच आपल्या घरी बोलावले होते. असं म्हटलं जातं की त्यानंतर २ दिवस सैफ तिच्याच घरी थांबला होता. त्यानंतर ते एकमेकांना डेटही करू लागले होते. पण याच दरम्यान, सैफ चित्रपटाबाबत अप्रोफेशनल झालेला. तो बिलकूलचं वक्तशीर नव्हता, असंही म्हटलं जातं की सैफला लवकर उठण्याची सवयही नव्हती. सैफचं हे वागणं राहुल रवैलला बिलकूलच पटलं नाही, अन् त्याने थेट सैफला चित्रपटातूनच काढून टाकलं. त्याचमुळे मग सैफची भूमिका केली कमल सदनाहने.

पुढे सैफने काही आशा सोडली नाही. त्याने १९९१ मध्ये अमृताबरोबर लग्नही केले. या लग्नाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलेलं. कारण एकतर अमृताने इंडस्ट्रीत जम बसवायला सुरुवात केलेली, तर सैफ अजून चाचपडत होता. इतकंच नाही तर सैफपेक्षा अमृत्ता तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. त्यावेळी असंही म्हटलं जातं की जेव्हा सैफ बेखुदी चित्रपटावेळी काजोल सैफकडे आकर्षित झालेली, तिने सैफला असंही विचारलेलं की तो अमृतासारख्या मुलीशी लग्न कसं करू शकतो. त्यानंतर अमृतानेही काजोलविरुद्ध अनेक मुलाखतींमध्ये भाष्य केलेली.

पुढं सैफ आणि अमृता यांचा संसार काही वर्षे चांगला चालला, त्यांना एक मुलगी आणि मुलगाही झाला. आज त्यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमधील उदयोन्मुख अभिनेत्रीही आहे. तर मुलगा इब्राहिम अली खानही अनेकदा चर्चेत येत असतो. मात्र, सैफ आणि अमृता यांच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागावी असं झालं आणि हे दोघे लग्नानंतर १३ वर्षांनी वेगळे झाले.

पुढे सैफने करिना कपूरशी लग्न केले, त्यांना दोन मुलंही आहेत, तर अमृताने लग्न न करणेच पसंत केले. असं असलं तरी सैफ आणि अमृता यांच्यात कसलीही कटूता असल्याचे दिसत नाही. सैफही सारा आणि इब्राहिम या आपल्या दोन्ही मुलांबरोबरही वेळ घालवताना दिसत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

लग्नाला ९ वर्ष होऊनही सरगुन मेहता का नाही झाली आई? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

‘बिग बॉस’मधील गाजलेली जोडी रेशम-राजेश पुन्हा एकत्र, नक्की काय आहे प्रकरण?

‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता राणा जंग बहादुरला अटक

 

हे देखील वाचा