Tuesday, February 24, 2026
Home बॉलीवूड ‘माझ्यात तेवढा दम नाही’, बॉलिवूडच्या तीन खानबद्दल करण जोहरचे खळबळजनक वक्तव्य

‘माझ्यात तेवढा दम नाही’, बॉलिवूडच्या तीन खानबद्दल करण जोहरचे खळबळजनक वक्तव्य

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या शोमध्ये ‘कॉफी विथ करण‘ याचा समावेश होतो. चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की, हा शो आता सातव्या पर्वात आहे. यंदा शोचे सातवे पर्व सुरू होण्यास आता फक्त १ दिवस बाकी आहे. हा शो येत्या ७ जुलैपासून सुरू होणार आहे. यापूर्वीच शोचा होस्ट करण जोहर याने मान्य केले की, प्रसिद्ध व्यक्ती जेव्हाही शोमध्ये काही बोलतात, त्यामुळे चिंता वाढते. त्याने असेही म्हटले की, त्याच्याकडे शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांना आपल्या शोमध्ये बोलवण्याची ताकद नाहीये.

करण जोहर (Karan Johar) याने ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) शोच्या पहिल्या एपिसोडचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) दिसत आहेत. या शोमध्ये करण कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारतो. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाला की, “या पर्वात तीन खान येणार नाहीत. माझ्याकडे त्यांना घेऊन येण्याची ताकद नाहीये. मी त्यांना पार्टीमध्ये बोलवू शकतो. मात्र, आपल्या शोवर नाही. मी तर तीनपैकी दोन खानला मेसेजही करू शकत नाही. रणबीरनेही म्हटले की, मी येत नाहीये. त्याने म्हटले की, ‘मी काही बोललो, तर चिंता वाढेल, त्यामुळे मला यायचं नाही.'”

‘कॉफी विथ करण’चे ६ पर्व राहिले हिट

‘कॉफी विथ करण’ हा शो २००४साली सुरू झाला होता. तसेच, या शोचे ६ पर्व यशस्वी राहिले. आता सातव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. करणला असे वाटते की, “अभिनेते कोणतीही गोष्ट इतर कुठल्याही ठिकाणी बोलू शकतात. मात्र, माझ्या शोवर बोलले, तर अडचणी वाढतात. लोक हल्ला करण्यासाठी तयार असतात की, ‘कॉफी विथ करण’ शोवर म्हणाला होता. मी माझ्या शोच्या प्रतिष्ठेवरून चिंतेत आहे.”

सातव्या पर्वापर्यंत करणमध्ये झाला खूपच बदल
‘कॉफी विथ करण’ शो ७ जुलैपासून डिझ्नी प्लस हॉटस्टारवर दाखवला जाईल. पहिल्या पर्वापासून सातव्या पर्वापर्यंत करण जोहरमध्ये खूप बदल झाला आहे. शोचा होस्ट करणचा विश्वास आहे की, “पहिल्या पर्वात मी एका लहान मुलासारखा होतो, ज्यामध्ये मला माझी कोणतीही काळजी नव्हती. पर्वात खूपच सहजता होती. पण मला आता पर्वा नाही की, मी कसा दिसतो, माझे हावभाव कसे आहेत किंवा मग मी खूप जोरात हसतो.”

आता हा शो सुरू झाल्यानंतर कलाकारांकडून काय गुपीतं समजतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

यूपी पोलिसांचे ट्वीट वेधतंय सर्वांचं लक्ष, ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे पोस्टर शेअर करत म्हणालेत, ‘११२ डायल करा’

लव्ह मॅरेज करण्याचा विचार करताय? जरा थांबा आणि बघा अभिनेता राजकुमार रावची अवस्था

सुरुवातीला खाल्ला खस्ता, पण मेहनतीच्या जोरावर बनला ‘एनर्जेटिक’ अभिनेता, वर्षाला छापतो ‘इतके’ कोटी

हे देखील वाचा