बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने (Shahrukh Khan) १९९०च्या दशकात हेमा मालिनी (Hema Malini) दिग्दर्शित ‘दिल आशना है’ मध्ये काम केले होते. एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानने खुलासा केला होता की, हेमाने शूटिंगदरम्यान एकदा त्याचे केस विंचरले होते. शाहरुख आणि हेमा शेवटचे २००४मध्ये आलेल्या ‘वीर-जारा’मध्ये एकत्र दिसले होते.
‘दिल आशना है’ची निर्मिती आणि दिग्दर्शन हेमा यांनी एचएम क्रिएशन्सच्या बॅनरखाली केले होते. या चित्रपटात शाहरुख, दिव्या भारती (Divya Bharti), जितेंद्र (Jeetendra), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakravarti), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), अमृता सिंग (Amrita Singh) आणि सोनू वालिया (Sonu Walia) यांच्या भूमिका होत्या. ‘दिल आशना है’ हा शाहरुखने १९९१मध्ये साइन केलेला पहिला चित्रपट होता. परंतु विलंबामुळे डिसेंबर १९९२ मध्ये रिलीझ झाला. काही महिन्यांनंतर, जून १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’मधून त्याने पदार्पण केले. (hema malini once combed shahrukh khans hair)
‘मी दिल्लीचा मुलगा आहे’
इंडिया टीव्ही शो ‘आप की अदालत’मध्ये शाहरुखने खुलासा केला की, “हेमा मालिनी यांनी मला कामासाठी बोलावले आणि सांगितले, ‘तुला मेकअप आणि सर्व काही करावे लागेल.’ मी त्यांना सांगितले, ‘मी दिल्लीचा मुलगा आहे आणि मला मेकअपबद्दल जास्त माहित नाही.’ मग हेमाजी माझ्याकडे आल्या आणि कंगव्याने केस विंचरले. त्याच दिवशी मी ठरवलं की, मी इथेच राहणार आणि मुंबई सोडणार नाही.”
हेमाला आवडत नव्हते शाहरुख खानचे केस
‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या चरित्रात हेमाने लिहिले आहे की, ऑडिशनदरम्यान शाहरुखचे केस त्यांना आवडले नाहीत, कारण केसांमुळे त्या डोळे पाहू शकत नव्हत्या.
सध्या शाहरुख ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. यशराज फिल्म्स द्वारे समर्थित आणि सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) देखील आहेत आणि २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा