चित्रपटसृष्टी कोणतीही असो, त्यातील कलाकार विशेषत: अभिनेत्री आपल्या हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. हल्ली तर अभिनेत्री सर्सास आपले बोल्ड फोटोशूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. या अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे तेलुगु चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘अप्सरा राणी’ होय. तिने नुकतेच आपले बोल्ड फोटोशूट केले आहे. यादरम्यानचे बिकिनीतील फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. हे फोटो पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्री राणीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदम भन्नाट दिसत आहे. तिचे हे फोटो स्विमिंग पूलशेजारी काढले आहेत.
विशेष म्हणजे हे फोटो तिने एकसोबत इंस्टाग्रामवर शेअर केले नाहीत. तिने यातील पहिला फोटो २६ फेब्रुवारीला पोस्ट केला होता. यानंतर तिने नुकताच एक फोटो शेअर केला.
हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “मला बीच थेरपी पाहिजे.”
दुसऱ्या एका फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले की, “आज ब्लू है पानी… पानी…”
अप्सराचे हे फोटो चाहत्यांना भलतेच आवडले आहेत. बिकिनीमधील फोटो शेअर करण्याची ही राणीची पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही तिने बिकिनीतील अनेक फोटो शेअर केले होते.
दिग्गज निर्माता राम गोपाल वर्मा यांनी राणीला एका थ्रिलर वेब सीरिजमध्ये घेतले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राणीचा हॉट लूक सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला होता. तिने राम गोपाल वर्मा यांच्यासोबत अनेक फोटो शेअर केले होते.
तिने इतरही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘ओलाल्ला ओलाल्ला‘ आणि ‘४ लेटर्स’ या चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-टायगर श्रॉफच्या बहिणीची सोशल मीडियावर धमाल! कृष्णा श्रॉफ लावतीये चाहत्यांना वेड, पाहा फोटो
-प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मुलीचे हटके अंदाजातील फोटोशूट व्हायरल, फोटोंवर लाखो लाईक्सचा वर्षाव