प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मुलीचे हटके अंदाजातील फोटोशूट व्हायरल, फोटोंवर लाखो लाईक्सचा वर्षाव

Bollywood Actress Janhvi Kapoor Shares Latest Photoshoot In Backless Top And Pink Pants Photos Viral


सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचे प्रमाण हल्ली खूपच वाढलेले दिसते. यामध्ये सामान्य व्यक्तींपासून ते दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आता सोशल मीडियावर वावरताना दिसतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ‘जान्हवी कपूर’. ती नेहमीच आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकतेच तिने फोटोशूट केले आहे. यामध्ये ती हटके अंदाजात दिसत आहे. तिचा हा फोटो भलतेच व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोशूटचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने ‘पलट’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. यासोबतच तिने ‘#Ruhi डे सेकंड’ असा हॅशटॅगही दिला आहे. तिच्या या फोटोंना ६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

तिने शेअर केलेल्या या फोटोत सिल्व्हर टॉप आणि गुलाबी रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. यासह तिने मेकअपही केला आहे. तिने जांभळ्या रंगाचे आयलायनरही लावले आहे. सोबतच तिने आपले केस बांधले असून कानातलेही घातले आहे. या लूकमध्ये ती एकदम भन्नाट दिसत आहे.

जान्हवीने सन २०१८ साली ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली होती. तिच्या या चित्रपटातील भूमिकेला चाहत्यांनी पसंती दर्शवली होती.

याव्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये तिचा मागील ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा चित्रपट अनेक कारणांमुळे वादात अडकला होता. जान्हवी कपूर लवकरच ‘रूही’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेल तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. या चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त अभिनेता राजकुमार रावही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ मार्च, २०२१ रोजी रिलीझ होणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही सुरुवात झाली आहे.

‘रूही’ चित्रपटातील पहिले गाणे ‘पनघट’ चाहत्यांच्या भेटीला आले होते. यानंतर आता यामधील दुसरे गाणे ‘किस्तों’ही रिलीझ केले आहे. जान्हवीने शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याचा टिझर शेअर केला होता. यामध्ये तिने ‘#kiston, लिंक बायोमध्ये आहे. #११ मार्च, २०२१ रोजी सिनेमाघरात रुही येत आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन दिले होते.

याव्यतिरिक्त ती ‘गुड लक जेरी’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.