टीव्ही अभिनेत्री क्रिसन बॅरेटोने (Krissann Barrotte) पुन्हा एकदा तिच्या आकर्षक लूकसाठी सतत चर्चेत असते. क्रिसन बॅरेटोचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार इंस्टाग्रामवर पाहायला मिळतो. अशातच तिने लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. या लेटेस्ट व्हिडओमध्ये ती किलर लूकमध्ये कमाल दिसत आहे. क्रिसन बॅरेटो अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेक फोटो शेअर करत असते. तिचे अनेक चाहते आहेत, जे तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतात.
क्रिसन बॅरेटोचा जन्म ३ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत झाला. तिने मुंबईतूनच शिक्षण घेतले. ती झेवियर कॉलेजमधून उत्तीर्ण झाली आहे. त्यानंतर तिने मुंबईतील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. क्रिसन बॅरेटो म्हणते की, तिला डान्स आणि पार्टी करायला आवडते. (who is sasural simar ka fame krissann barretto)
क्रिसन बॅरेटोचे पदार्पण
क्रिसन बॅरेटोने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली. तिने २०१४ मध्ये ‘कैसी ये यारियां’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ती अनेक शोजमध्ये दिसली.
ब्युटी विथ ब्रेन म्हणजे क्रिसन बॅरेटो
क्रिसन बॅरेटोने बांग्लादेशी जाहिरातींमध्येही काम केले आहे. यानंतर तिने एमटीव्हीच्या कॅम्पस डायरीचे आयोजनही केले. क्रिसनला ब्युटी विथ ब्रेन असेही म्हटले जाते. अभिनेता असण्यासोबतच ती एक चांगली होस्ट आणि हिप हॉप डान्सर देखील आहे.
‘ससुराल सिमर का’मध्ये केलंय काम
क्रिसन बॅरेटोने ‘ससुराल सिमर का’ टीव्ही शोमध्येही काम केले आहे. या शोची मुख्य पात्र सिमरच्या मुलीच्या भूमिकेत ती दिसली आहे. अशा प्रकारे तिची कारकीर्द नेहमीच चमकत राहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










