Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड विश्वासच बसेना! सुष्मिता- ललित मोदींचे नाते आख्ख्या जगाला समजले, पण अभिनेत्रीने वडिलांनाच ठेवले अंधारात

विश्वासच बसेना! सुष्मिता- ललित मोदींचे नाते आख्ख्या जगाला समजले, पण अभिनेत्रीने वडिलांनाच ठेवले अंधारात

विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने ललित मोदी यांच्यासोबतचे नाते अचानक समोर आल्याने प्रत्येकजण हैराण आहे. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी सुष्मिताच्या नात्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आता ललित मोदी आणि सुष्मिताच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणावर मौन सोडले आहे. ललित मोदी यांचा मुलगा रुचीर मोदी याने म्हटले आहे की, त्यांना आधीपासून या नात्याबद्दल माहिती होते. आा सुष्मिताचे वडील निवृत्त हवाई दल अधिकारी शुबीर सेन यांनी तिच्या नात्याविषयी धक्कादायक विधान केले.

गुरुवारी (दि. १४ जुलै) ललित मोदी (Lalit Modi) यांनी सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्यासोबत अनेक रोमँटिक फोटो शेअर केले होते. यासोबतच त्यांनी ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी ट्वीट केल्यानंतर सुष्मिता आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये स्पष्ट करत रम्हटले की, ते एकमेकांना फक्त डेट करत आहेत. यावेळी त्यांनी लग्नाला नकार दिला नाही. त्यांनी असेही लिहिले की, हेदेखील एकेदिवशी नक्की होईल. सुष्मितानेही नंतर एक पोस्ट शेअर करत दोघांनी लग्न केले नसल्याचे स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना शुबीर म्हणाले की, “मला याबाबत काहीही माहिती नव्हते. मी गुरुवारी सकाळी आपल्या मुलीशी चर्चा केली होती. मात्र, तिने काहीही सांगितले नाही. मी पहिल्यांदा ट्वीट पाहिले, जेव्हा तुम्ही मला मेन्शन केले होते. मला माहिती नव्हते की, त्याबाबत काय बोलले पाहिजे, ज्याबाबत मला बिल्कुलच माहिती नाही.”

ते पुढे म्हणाले की, नंतर त्यांना सुष्मिता आणि ललित मोदींच्या नात्याबाबत जाणून घ्यायला आवडेल. आता त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. त्यांनी म्हटले की, “आम्ही सामान्यत: मुलांबाबत आणि तब्येतीबाबत चर्चा करतो. ती व्यवस्थित जेवत आहे की नाही. आम्ही नेहमीप्रमाणे चर्चा केली. मी त्यांच्याबद्दल (ललित मोदी) काहीच ऐकले नाहीये. जर त्यांच्याबद्दल काही समजले, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. लपवण्यासारखं काहीच नाहीये.”

शुबीर सेन आपल्या मुलीच्या नात्याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगत आहेत. यावर चाहत्यांना विश्वास बसणे जरा कठीणच आहे. सुष्मिताच्या नात्याविषयीची माहिती त्यांना ट्विटरवरून मिळाली. एकीकडे संपूर्ण जगाला सुष्मिता आणि ललित यांच्या नात्याविषयी समजले होते, पण तिच्या वडिलांना याबाबत काहीच माहिती नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

बाबो! स्टेजवरच रणबीरने घेतली अभिनेता आदित्य रॉय कपूरची पप्पी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

याला म्हणतात लोकप्रियता! शहनाज गिलच्या गळ्यात पडून रडायला लागली चाहती, व्हायरल व्हिडिओने नेटकरीही झाले भावुक

राखीला दमच नाही! ‘ड्रामा क्वीन’ने करून टाकली अंकिताच्या प्रेग्नंसीची पोलखोल, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

हे देखील वाचा