स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळते.ज्यामध्ये मालिकेतील लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईकची (Akshaya Naik) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मालिकेत लतिकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षयाला लग्नाला मात्र लग्नाला नवरा मिळत नाही. अशी खंत खुद्द अभिनेत्रीनेच व्यक्त केली आहे. काय आहे ही नेमकी बातमी चला जाणून घेऊ.
अक्षया नाईक ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षया नाईकची सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेतील अक्षयाची लतिका ही व्यक्तीरेखा खूपच लक्षवेधी असून तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मालिकेत अक्षयाने जाड मुलीची एक आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असलेल्या अक्षयाने तिला लग्नासाठी मुलगा मिळत नसल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ज्यावरुन ती आपल्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत असते. अलिकडेच तिने आस्क मी एनिथिंग हे सेशन इंस्टाग्रामवर ठेवले होते. ज्यामध्ये अनेकांनी अक्षयाला तिच्या खासगी तसेच अभिनय करिअरबद्दल प्रश्न विचारले होते. यामधेच एका व्यक्तीने तिला लग्न कधी करतेस असा प्रश्न विचारला होता. ज्यावर अक्षयाने लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये, त्यात मी मनाने अदिती द्रविडची आहे असे भन्नाट उत्तर दिले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली असून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान अदिती द्रविडही सुंदरा मनामध्ये भरली मालिकामध्ये काम करत असूनव तिची आणि अक्षयाची घट्ट मैत्री आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा