सुशांतच्या स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी अंकिताने केला खास फोटो शेअर; म्हणाली, ‘अंतर महत्त्वाचे नसते, कारण…’

मागील वर्षी म्हणजेच १४ जून, २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीसोबतच त्याच्या फॅन्सला देखील मोठा झटका बसला होता. सुशांतच्या निधनामुळे त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड असलेल्या अंकितालाही मोठा झटका बसला होता. एकता कपूरची सुपरहिट मालिका’पवित्र रिश्ता’मधून अंकिता आणि सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेदरम्यानच अंकिता आणि सुशांत जवळ आले आणि प्रेमात पडले. अनेक वर्ष एकत्र राहून पुढे या दोघांचे ब्रेकअप झाले.

सुशांतच्या जाण्याचा धक्का अंकितासाठी सर्वांत मोठा होता. सोमवारी (१४ जून) सुशांतचा पहिला स्मृतिदिन आहे. या संपूर्ण वर्षभरात अंकिताने सुशांतला अनेकदा आठवले आणि त्याच संदर्भातल्या अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर पोस्ट करायची. आतासुद्धा अंकिताने तिचा एका फोटो आणि त्यासोबत एक सूचक असे कॅप्शन पोस्ट केले आहे. या फोटोत अंकिताने लाल रंगाचे जॅकेट, ग्रे रंगाचा टी शर्ट आणि जीन्स घातली असून, ती समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असून, आकाशाकडे पाहत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

काळ्या ढगांनी भरलेल्या संपूर्ण आकाशाकडे पाहणाऱ्या अंकिताने तिच्या या फोटोला कॅप्शन देताना लिहिले, “अंतर महत्त्वाचे नसते, कारण दिवसाच्या शेवटी आपण सर्व एकाच आकाशाखाली असतो.” अंकिताचे हे कॅप्शन वाचून फॅन्स अंदाज लावत आहेत की, अंकिताने ही पोस्ट सुशांतसाठीच पोस्ट केली आहे. अंकिताच्या या पोस्टवर फॅन्स देखील भरपूर कमेंट्स करत आहेत.

मागच्या काही दिवसांपूर्वी अंकिताने सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सुशांतच्या स्मृतिदिनाच्या एका दिवस अगोदर अंकिता पुन्हा सोशल मीडियावर परतली आहे. अंकिता आणि सुशांत फॅन्सचे सर्वात आवडीचे कपल होते. या दोघांच्या ब्रेकअपमुळे फॅन्स खूप नाराज झाले होते. मात्र, काही काळाने दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आणि आता अंकिता विकी जैनसोबत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

Latest Post