Monday, October 2, 2023

बाबो..!! मालिकेच्या शुटिंगवेळी सेटवर घुसला बिबट्या आणि अजगर; अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. अलीकडेच तो ‘कुंडली भाग्य’मधे दिसला होता. त्यात त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवत चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांनतर आता अभिनेता शक्ती अरोरा ‘गम है किसी के प्यार में‘ या शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे.

शक्तीला (Shakti Arora) अलीकडेच ‘गम है किसी के प्यार में’ या मालिकेत प्रवेश केला आहे. शोमध्ये तो इशानची भूमिका साकारत आहे. शक्ती सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसह नवीन शोची झलक शेअर करत असतो. त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शक्ती अरोराने सोशल मीडिया एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता शक्तीने शोच्या सेटवर अजगराची धक्कादायक झलक दाखवली आहे.

एक व्यक्ती साप पकडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शक्तीने अजगराबद्दल अपडेट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज आमच्या सेटवर हा सुंदर साप पकडला गेला. साप पकडणाऱ्याने सांगितले की, या अजगराने किमान 150 अंडी घातली आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही, त्याला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.” सेटवर साप आल्यामुळे तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

काही चाहत्यांनी शक्तीच्या पोस्टच्या कमेंट करत यावर चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी अतिशय मजेदार कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मला वाटतं नागिनच्या सेटवर सापाला जायचे होते पण तो चुकीच्या ठिकाणी आला.’ दुसऱ्याने कमेंट करताना लिहिले की, “त्या सापाला पण शूटिंग बघायची होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Arora (@shaktiarora)

यादरम्यान, शक्तीने पुढे सांगितले की, “कलाकार होणे सोपे नाही. काहीही झाले तरी काम करावचं लागत. आपण कितीही आजारी पडलो तरी एक दिवस सुटी देखील घेऊ शकत नाही. कारण शूट करणे खूप गरजेच असते.” तीन दिवसांपूर्वी सेटवर बिबट्या शिरल्याचेही शक्तीने सांगितले होते. (A leopard and a python entered the sets of ‘Gum Hai Kisi Ke Pyaar Mai’)

अधिक वाचा-
प्रेम! संजीव कुमारांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ‘ही’ अभिनेत्री, अभिनेत्याचे निधन होताच गेली होती नैराश्यात
शशांक केतकरने बस स्टॉपवरील ‘तो’ फोटो केला शेअर; अभिनेता समीर खांडेकर म्हणाला…

हे देखील वाचा