Monday, October 2, 2023

‘गुम है किसी के प्यार में’च्या सेटवर निघाला माेठा अजगर, शक्ती अराेरा याने शेअर केला व्हिडिओ

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता शक्ती अरोरा सध्या त्याच्या नवीन शो आणि व्यक्तिरेखेमुळे चर्चेत आहे. ‘कुंडली भाग्य‘नंतर अभिनेता आता ‘गुम है किसी के प्यार में‘मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जनरेशन लीपनंतर, शक्ती या मालिकेमध्ये इशानची भूमिका साकारताना दिसत आहे. शोमधील ईशानच्या भूमिकेत त्याला लोक खूप पसंत करत आहेत. अशात अलीकडेच शक्ती अरोरा यांनी टीव्ही शोच्या सेटवर अजगर निघाल्याची माहिती दिली आणि त्याचा एक व्हिडिओही साेशल मीडियावर शेअर केला आहे, जाे तुफान व्हायरल हाेत आहे.

शक्ती अरोरा (shakti arora) याने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, ‘गुम है किसी के प्यार में’ अभिनेता शोच्या सेटवर अजगर निघाल्याची झलक दाखवत आहे.

या व्हिडिओमध्ये सर्प पकडणाऱ्याने अजगराला पकडून ठेवलेले दिसत आहे, ज्यामुळे तो इतर कोणालाही हानी पाेहचवू शकत नाही. हा व्हिडिओ शेअर करत शक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा अजगर आज ‘गुम है किसी के प्यार में’च्या सेटवर पकडला गेला आणि अजगर पकडणाऱ्याने सांगितले की, त्याने किमान 150 अंडी दिली आहेत. मात्र, काळजी करू नका त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडले आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Arora (@shaktiarora)

अशात मालिके विषयी बाेलायचे झाले तर, सावी (भाविका शर्मा), इशान (शक्ती अरोरा) आणि रिवा (सुमित सिंग) यांच्याभोवती फिरत आहे. दुसरीकडे शोमध्ये, सावीला आईपीएस अधिकारी बनण्याचे तिच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहे. भाविका, इशान आणि सुमितसोबतच मानसी साळवी, इंद्रनील भट्टाचार्य, वैशाली ठक्कर आणि पारस मदन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.(tv actor shakti arora shares shocking updates as a python is spotted on sets of ghum hai kisikey pyaar meiin )

अधिक वाचा-
‘मैं पुण्य हूं या पाप हूं… नाम तो सुना होगा’, शाहरुख खानच्या ‘जवान’चा अ‍ॅक्शन-पॅक्ड दमदार ट्रेलर रिलीज
सिद्धार्थ जाधव सारखा दिसणारा ‘हा’ माणुस तुम्ही पाहायलाय का? पाहा फोटो

हे देखील वाचा