Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन वनिता खरात आणि गौरव मोरेने ‘छोटे मियां बडे मियां’ गाण्यावर लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

वनिता खरात आणि गौरव मोरेने ‘छोटे मियां बडे मियां’ गाण्यावर लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. हसवून हसवून लोकांचे खऱ्या अर्थाने टेन्शन दूर करणारा हा शो कोणी पाहिला नसेल असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मराठी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक विषेश ओळख निर्माण केली आहे. सध्या या कार्यक्रमाने ब्रेक घतला आहे. पण या कार्यक्रमातील कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातील कलाकार सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले कलाकारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घालात आहेत. या व्हिडिओमध्ये गौरव मोरे (Gaurav More) आणि वनिता (Vanita Kharat) दिसत आहेत. हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. गौरव आणि वनिता अमेरिकेच्या रस्त्यावर बडे मिया छोटे मिया चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा भन्नाट डान्स लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गौरव आणि वनिता हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहते खूप साऱ्या कमेंट करत आहेत. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘गौरव भाई, वनिता तुझ्यासोबत आहे त्यामुळे तु आजिबात घाबरू नकोस.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘खूप छान डान्स. तसेच काहीजण त्यावर हार्ट इमोजी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

या दरम्यान, नुकताच गौरव मोरेने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, “हम लोग अमेरिका में मचारेले भाई. खरतनाक प्रेम आहे. प्रेक्षकांचे खूप खूप आभार अमेरिका” हा कार्यक्रम पाहण्यासाठी अमेरिकेतील हजारो मराठी प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (A video of Gaurav More and Vanita Kharat of Maharashtra’s comedy fair fame is going viral on social media)

अधिक वाचा-  
‘ह्रदयी प्रीत जागते…’ म्हणत प्राजक्ताने वेधले सर्वांचे लक्ष, पाहा फोटो
पठाण ‘जवान’ झाला! सलमान खानने शाहरुखच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून केली पोस्ट शेअर म्हणाला…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा