Tuesday, March 19, 2024

‘पडद्यावरचे विश्व फारच वेगळे, भन्नाट’, मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून उलगडले मनोरंजनविश्वात येण्यामागचे रहस्य

अनेकदा आपल्याला बरेच लोकं विचारतात तू तुझे करियर कसे निवडले. आपण देखील आपल्याला कुठे जायचे आहे, कोणत्या क्षेत्रात काम करायचे हे सर्व आजूबाजूची परिस्थिती पाहून ठरवत असतो. अर्थात आपल्या करियर निवडीमागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. याला काही लोकं अपवाद देखील असतील मात्र करियर निवड ही काही गोष्टींवर अवलंबून असते हे नक्की. असे सर्वांच्याच बाबतीत घडत असते. अनेकदा आपण आपल्या आवडत्या कलरच्या मुलाखती ऐकवतो, बघतो, वाचतो त्यात ते देखील ते या मनोरंजनविश्वात कसे आले ते सांगताना दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मराठीमधील प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जाणारे मिलिंद गवळी यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून ते या मनोरंजनविश्वात कसे आले ते सांगितले आहे. स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते?’ या सुपरहिट मालिकेत मिलिंदजी अनिरुद्ध ही भूमिका साकारत आहे. मागील बरीच वर्षांपासून ते या क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. आता त्यांनी त्यांच्या या क्षेत्रात येण्यामागील एक रहस्य उलगडले आहे. मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की,
“मै चला अकेला, रास्तों पे”
मेरे पीछे कोई भी नहीं है, मेरे जो है सपने वही तो है अपने,
आपण जेव्हा शाळेत असतो त्या वेळेला आपण मोठं व्हायची स्वप्न बघत असतो , मोठा झाल्यानंतर आपल्याला काय व्हायचं हे ? ठरवत असतो . लोकांकडे बघतो , त्यांचं आयुष्य बघतो आणि आपल्याला असं वाटतं आपण यांचे सारखं व्हावं, मी लहानपणी बघितलेली माणसं, त्या माणसांन मद्धे, मला बहुतेक सगळीच माणसं आवडायची , फक्त आमच्या घरी एक पॉलिटिशन यायचे, ते आमचे नातेवाईक होते, ते आले की घरा मधलं वातावरणच बदलून जायचं , सगळ्यांनची धावपळ, सगळे आपलं काम सोडून त्यांची वाट बघत बसायचे, ते आले की त्यांना खूप भाव मिळायचा, पण त्यांना भेटलं की मला एक खूप माज असलेला अहंकारी माणूस त्यांच्यामध्ये दिसायचा, तेव्हाच मी ठरवलं होतं की आयुष्यामध्ये कधीही असं पॉलिटिशन व्हायचं नाही,

वडील पोलीस खात्यात असल्यामुळे असंख्य पोलीस ऑफिसर्स यायचे, बरेचसे चांगले प्रेमळ असायचे पण काहींमध्ये परत तोच माज असायचा, मग आपण पोलीस ऑफिसर झालो तर वडिलांसारखा चांगला ऑफिसर व्हायचं असं मनामध्ये ठरवलं, पण माझं डोकं तापट होतं, त्यामुळे आपल्याला चांगला प्रेमळ वगैरे होता येणार नाही , आपण खूप हाणामाऱ्याच करू, जर आपण पोलीस झालो तर , याची मला खात्री होती. पोलीस स्टेशनच्या वरती राहायचो आम्ही, त्यामुळे शाळेमध्ये जाताना येताना खाली बऱ्याचशा आरोपींची सुद्धा ओळख व्हायची माझी, अंडरवर्ल्डचे लोकं असायचे ते , पण त्यांच्याकडे बघून मला, आपण कधीच अंडरवर्ल्डमध्ये जायचं नाही , असंच मनाने ठरवून टाकलं होतं.

सिनेमे बघायला जायचो कधी कधी, त्यामुळे पडद्यावरचे विश्व फारच वेगळं आणि भन्नाट वाटायचं, त्या विश्वात जर आपल्याला जायला मिळालं तर किती मजा येईल, पण तिकडे कसं जातात हे काहीच माहिती नव्हता, हिरोज पडद्यावर करतात ते सगळे आपल्याला यायला हवं, अमिताभ बच्चन ने मुकद्दर का सिकंदर मध्ये हात सोडून मोटरसायकल चालवलतो मग तशी हात सोडून मोटर सायकल चालवायला शिकलो , मेरा गाव मेरा देश मध्ये विनोद खन्ना घोडा चालवतो , मग घोडा चालवायला पण शिकलो, पोहायला शिकलो,

आपल्याला जे जे सुचेल ते ते सगळ करायची तयारी होती, पण त्या पडद्यावर जायचं, पुढे सगळा अंधारच होता, पण आपण त्या रस्त्यावर चालायचं, मार्ग शोधून काढायचा, दहावीत असताना एकदा शूटिंग बघायला गेलो, आणि छोटासा प्रकाश दिसला, “हम बच्चे हिंदुस्तान के” नावाचा चित्रपट होता , तो माझा पहिला चित्रपट, ते डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चं“आई कुठे काय करते “ प्रवास चालूच आहे, मार्ग काढत, चाचपडत धडपडत, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे”.

या पोस्टमधून मिलिंद गवळी आणि त्यांच्या अनुभवावरून, लोकांचे निरीक्षण करून काय करायचे काय नाही करायचे हे ठरवले. पूर्ण विचार करून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा विचार केला. स्वतः मार्ग शोधत पुढे जात ते आज इथपर्यंत आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा