Friday, March 29, 2024

अभिनेता आमिर खानला आणखी एक धक्का, ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट झाला ऑनलाईन लीक

आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आमिरचा चित्रपट बहुतांश लोकांना पसंत पडत आहे. सेलिब्रिटींपासून अनेक चाहत्यांपर्यंत या चित्रपटाचे वर्णन ब्लॉकबस्टर म्हणून केले जात आहे. आमिरच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. पण या बातमीने आमिरला धक्का बसू शकतो. चला तर जाणून घेऊया काय प्रकरण आहे.

लालसिंग चड्ढा ऑनलाइन लीक झाला
बॉयकॉट ट्रेंडमुळे आमिर खान (Aamir Khan) याच्या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली आहे. आमिरचा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. मात्र आमिर खानचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट ‘लाल सिंग चड्ढा’ आज रिलीज झाला आणि आता हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याच्या बातम्या येत आहेत.

माध्यामांच्या वृत्तांनुसार लाल सिंग चड्ढा यांना तमिलरॉकर्स, मुव्हिरुलजं आणि पायरसीवर आधारित अनेक वेबसाईट लीक झाल्या आहेत. टेलिग्रामवरही चित्रपटाचा लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की, काही टेलिग्राम ग्रुपवर चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्याचा पर्याय दिला जात आहे.

चित्रपटाच्या व्यवसायावर होणार परिणाम
रिलीजच्या दिवशीच चित्रपट लीक झाल्यामुळे लाल सिंग चड्ढाच्या व्यवसायाला फटका बसू शकतो. आमिर खानने त्याच्या चाहत्यांना विनंती केली होती की, त्यांनी चित्रपटगृहात जाऊन त्याचा चित्रपट पाहावा. अशा परिस्थितीत चित्रपट लीक झाल्यामुळे लोकांनी तो ऑनलाइन पाहिला तर त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होईल. पण चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चित्रपट लीक झाले आहेत.

लाल सिंग चड्ढा हा ऑस्कर विजेत्या हॉलीवूडपट ‘फॉरेस्ट गंपचा’ रिमेक आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आमिर खानच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाशी टक्कर होत आहे. आता बघूया कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचे जास्त प्रेम मिळते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

बोल्ड आणि बिंधास्त! मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा

रक्षाबंधन स्पेशल! भाऊ बहिणींचे सुंदर नाते दाखवणारे ‘हे’ चित्रपट पाहाच

अभिनेत्री तब्बूचा सेटवर झाला अपघात; अ‍ॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला झाली गंभीर दुखापत

हे देखील वाचा