×

आमिर खानच्या लालसिंग चड्ढा सिनेमातील पहिले गाणे ‘कहाणी’ ऑडिओ व्हर्जनमध्ये झाले प्रदर्शित

आमिर खान (Aamir Khan) त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि भूमिकांसाठी बॉलिवूड जगतात प्रसिद्ध आहे. प्रत्येक भूमिकेसाठी जीवतोड मेहनत घेऊन त्यात जिवंतपणा आणणे ही आमिर खानच्या अभिनयाची खासियत आहे. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारालेल्या आमिर खान काही दिवसांपूर्वी त्याच्या लालसिंग चड्डा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, आमिर खान त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानने एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना एक कथा सांगणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून त्याच्या चाहत्यांनाही ही कथा ऐकण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. आता गुरुवारी (२८ एप्रिल) ला आमिर खानने त्याच्या चित्रपटातील ‘कहानी’ हे गाणे रिलीज केले आहे. तो म्हणाला होता की तो रेडिओ स्टेशनवर आपली कथा सांगणार आहे, कारण हे गाणे व्हिडिओपेक्षा ऐकण्यातच छान वाटते असे त्याचे म्हणणे आहे.

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

आमिर खानने चित्रपटाची सर्व गाणी कोणत्याही व्हिज्युअलशिवाय ऑडिओ व्हर्जनमध्ये रिलीज केली जातील. त्याने हे गाणे एका रेडिओ चॅनलवर शेअर केले आहे. हे मोहन कन्नन यांनी गायले असून गाण्याला अमिताभ भट्टाचार्य यांचे गीत आणि प्रीतम यांचे संगीत आहे. गाण्याबद्दल बोलताना आमिर म्हणाला की, “माझा खरोखर विश्वास आहे की ‘लाल सिंग चड्ढा’ ची गाणी चित्रपटाचा प्राण आहेत आणि या अल्बममध्ये माझ्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम गाणी आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

लाल सिंग चड्ढा’ चे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे, ज्यांनी 2017 मध्ये ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते आणि 2007 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटात सहाय्यक निर्मिती व्यवस्थापक होते. या चित्रपटात आमिर, करीना आणि मोना सिंग हे त्रिकूट 2009 च्या ब्लॉकबस्टर, ‘3 इडियट्स’ नंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. त्याचवेळी अभिनेता नागा चैतन्यही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि सैफ अली खान यांनीही कॅमिओ केला आहे. हा बहुचर्चित चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post