आमिर खानच्या ‘लाल चड्डा सिंग’ चित्रपटाच्या लोकेशनमध्ये बद्दल, ‘या’ ठिकाणी शूट होणार ऍक्शन सिक्वेन्स

Aamir Khan's new upcoming movie Lal Chadda Singh's shoting place change, action seen will shoot in ladhakh


‘कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजला‌ आहे. रुग्णांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता घराच्या बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. या सगळ्याचा परिणाम चित्रपटसृष्टीवर देखील झाला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खंड पडला आहे, तर काहींनी त्यांच्या शूटिंगचे ठिकाण बदलले आहे. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमिर‌ खानने असा निर्णय घेतला आहे की, तो त्याच्या ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटाची शूटिंग लडाखमध्ये जाऊन करणार आहे. त्याच्या चित्रपटातील अनेक ऍक्शन सिक्वेन्स सीन तो लडाखमध्ये शूट करणार आहे. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, जवळपास 45 दिवसांचे हे शूटिंग प्लॅन केले आहे. लडाख आणि कारगिल परिसरात ऍक्शन सिक्वेन्स सीन शूट केले जाणार आहेत. आमिर खानच्या या चित्रपटात दक्षिण चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजय सेतूपती दिसणार होता, पण आता त्याच्या जागेवर नागा चैतन्य दिसणार आहे.

‘लाल सिंग चड्डा’ हा चित्रपट 1994 मध्ये आलेला अमेरिकेतील चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तो एका शीखच्यया भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाची कहाणी अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. अद्वैत चंदन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते आमिर खान, किरण राव आणि राधिका चौधरी हे आहेत. आमिर खान हा नेहमीच कोणत्यातरी वेगळ्या विषयावर चित्रपट करत असतो. त्यामुळे त्याचा हा चित्रपट काय कमाल करणार आहे, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रुग्णालयात आईला बेड मिळण्यासाठी वृद्ध वडिलांना करावी लागली धावपळ’, जॅस्मिन भसीनने व्यक्त केल्या वेदना

-‘यामी गौतममुळे पुलकित सम्राट आणि माझे लग्न मोडले’, जेव्हा सलमानच्या बहिणीने केला होता धक्कादायक दावा

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.