‘यामी गौतममुळे पुलकित सम्राट आणि माझे लग्न मोडले’, जेव्हा सलमानच्या बहिणीने केला होता धक्कादायक दावा

when pulkit samrat ex wife and salman khan rakhi sister claimed that yami gautam broke her marriage


बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटने २०१४ साली सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि लग्नाच्या ११ महिन्यांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णयही घेतला. तसेच, पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिराने एकमेकांसोबत काम करत असताना, डेटिंग करण्यास सुरुवात केली होती. तथापि, लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्यातील संबंध बिघडू लागले आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हे जोडपे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस देखील साजरा करू शकले नाहीत.

‘यामी गौतममुळे तुटले आमचे नाते’
श्वेता रोहिराने एका मुलाखतीत त्यांच्या तुटलेल्या लग्नाचा खुलासा केला होता. यात तिने, यामी गौतममुळे त्यांचे लग्न मोडल्याचे सांगितले होते. श्वेता रोहिराने धक्कादायक खुलासा करत सांगितले की, २०१५ मध्ये तिचा गर्भपात झाल्या नंतर लगेच पुलकितने यामी गौतमला डेट करण्यास सुरुवात केली होती. ती म्हणाली होती, “यामीने माझे लग्न मोडले आहे. मी शेवटी माझ्या संभ्रमातून बाहेर आले आहे. एवढे सारे लोक खोटे बोलू शकत नाहीत. एक व्यक्ती येईपर्यंत आमच्यात सर्वकाही ठीक होते.”

‘सनम रे’च्या दरम्यान आल्या होत्या डेटिंगच्या बातम्या
जानेवारी २०१७ मध्ये श्वेता रोहिराने पुलकित सम्राटपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांनाही २३ जानेवारी रोजी वांद्रेच्या कौटुंबिक कोर्टात हजर करण्यात आले होते. जिथे दोघांच्या घटस्फोटाची कारवाई सुरू झाली. तसेच, पुलकित सम्राट आणि यामी गौतम यांनी ‘सनम रे’ चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यानंतरच त्यांच्या डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

‘प्रतिमा खराब करण्यासाठी सांगितले खोटे तथ्य’
पुलकित सम्राटने यामी गौतमशी कोणतेही संबंध असल्याच्या बातम्यांना नेहमीच नकार दिला होता. एका मुलाखतीत त्याने खुलासा केला होता की, गर्भपात झाल्याचे ऐकून तो चकित झाला, कारण ती दोघांमधील वैयक्तिक गोष्ट होती. पुलकित सम्राट म्हणाला होता की, श्वेता रोहिराने त्याची प्रतिमा वाईट दाखवण्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी सत्य चुकीच्या पद्धतीने सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्का अन् विराटच्या लग्नात चिक्कार पैसा केला होता खर्च, इटलीत पार पडलेल्या लग्नसोहळ्यात आले होते ‘इतके’ कोटी बिल

-दिग्गज अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, पत्नी सायरा बानो यांनी दिले त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट

-कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील


Leave A Reply

Your email address will not be published.