‘रुग्णालयात आईला बेड मिळण्यासाठी वृद्ध वडिलांना करावी लागली धावपळ’, जॅस्मिन भसीनने व्यक्त केल्या वेदना

jasmin bhasin is heartbroken and disappointed actress revealed finding bed for mother was difficult


कोरोनामुळे संपूर्ण देशाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. सर्वजण आपल्या प्रियजनांच्या आरोग्याबद्दल काळजीत आहेत. या विषाणूमुळे रुग्णालयात बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आता या दरम्यान जॅस्मिन भसीननेही आपली व्यथा व्यक्त केली आहे.

जॅस्मिनने सांगितले की, अलीकडेच तिच्या आईची तब्येत खूप बिघडली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. पण तिथे त्यांना बेड मिळाला नाही. यासाठी तिच्या वडिलांना बरीच धावपळ करावी लागली होती.

वास्तविक, शनिवारी (१ मे) जॅस्मिनने एक ट्वीट केले होते. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, “हे अतिशय दुःखद आहे. प्रत्येक ठिकाणी लोक जीव गमावत आहेत. लोक रस्त्यावर पडलेले आहेत, रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नाही. माझ्या स्वत: च्या आईनेही २ दिवसांपूर्वी या समस्येचा सामना केला आहे. आम्हाला रुग्णालयात तिच्यासाठी बेड मिळत नव्हता. माझे वृद्ध वडील तिच्यासाठी आरोग्य सुविधा शोधत होते. बरेच लोक या परिस्थितीतून जात आहेत. लोक आपल्या प्रियजनांचा गमावत आहेत, यासाठी आपण कोणास दोष द्यायला हवा? आपली आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली?”

अलीच्या कुटुंबाविषयी केले वक्तव्य
काही दिवसांपूर्वी जॅस्मिनने अली गोनीच्या कुटुंबासोबत राहण्याच्या अनुभवाविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती, “कुटुंबासोबत राहून मजा आली. कोव्हिड दरम्यान प्रत्येकाला एकटेपण जाणवत आहे. परंतु मी भाग्यवान आहे की, मला संपूर्ण कुटुंब मिळाले. आम्ही योग्य वेळी जम्मूला जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच आम्हाला या कठीण काळात कुटुंबाची साथ मिळाली.

अलीच्या कुटुंबाशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल जॅस्मिन म्हणाली, “मी अलीच्या कुटुंबाला गेल्या ३ वर्षांपासून ओळखते. आमच्यात कोणतीही औपचारिकता नाही. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत आणि नेहमीच एकमेकांच्या पाठीशी असतो. अलीचे कुटुंब बरेच कूल आहे. ते प्रेमळ आणि खूप चांगले आहेत. त्यांच्यासोबत खूप मजा येते.

लग्नाबद्दल म्हणाली असे
काही दिवसांपूर्वी जेव्हा जॅस्मिनला तिच्या लग्नाबद्दल विचारले गेले, तेव्हा ती म्हणाली की, “तुम्ही सर्वजण आताच लग्नाबद्दल का बोलत आहात. सध्या तर आम्ही प्रेमात आहोत. ज्यामुळे सध्या लग्नासाठी कोणताही मोठा प्लॅन नाही. आम्हाला अजून अधिक प्रेम करायचे आहे. त्यानंतर आम्ही लग्नाबद्दल विचार करू.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यामी गौतममुळे पुलकित सम्राट आणि माझे लग्न मोडले’, जेव्हा सलमानच्या बहिणीने केला होता धक्कादायक दावा

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.