गोष्ट साडीची असो नाहीतर वेस्टर्न फीट्सची, ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलीवूडच्या भल्या भल्या अभिनेत्रींना देते टक्कर


साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ‘आत्मिका’ने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. आत्मिकाचा जन्म ९ फेब्रुवारीला कोयंबतूर येथे एका मध्यमवर्गीय घरात झाला. तिने तिचे संपूर्ण शिक्षण कोयंबतूरमधेच घेतले. त्यानंतर ती चेन्नईला शिफ्ट झाली. तिने तिच्या करियरची सुरुवात मॉडलिंगने केली. या क्षेत्रात तिचे किंवा त्याच्या फॅमिलीमधील कोणाचे दूर दूर पर्यंत कनेक्शन नव्हते.

आज आत्मिकाने जे काही नाव कमावले ते निव्वळ तिच्या मेहनतीच्या जोरावर. आत्मिकाने तामिळ सिनेमा ‘मिसाया मुरुक्कू’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. चला तर मंडळी आज जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टी.

आत्मिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चित्रपटातील अभिनयापेक्षाही जास्त चर्चेत असते. तिला लाखो फॉलोवर्स आहे.

आत्मिकाच्या वेस्टर्न लुक पेक्षा जास्त तिच्या ट्रॅडिशनल लूकला फॅन्स जास्त पसंत करतात.

अतिशय सुंदर असलेली आत्मिका तिच्या स्टाईलने हिंदी सिनेमातील अभिनेत्रींना देखील कडवी टक्कर देते.

करियरच्या सुरुवातील आत्मिकाने अनेक जाहिरातींमध्ये, टीव्ही आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले.

आत्मिका तिच्या फिटनेससाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. ती तिच्या सोशल अकाऊंटवर अनेक वर्कआऊटचे व्हिडिओ नेहमी पोस्ट करत असते. तिला सायकलिंगची सुद्धा खूप आवड आहे. ती फिटनेसच्या बाबतीत मलायका अरोराला देखील टक्कर देते.

२०२० हे वर्ष आत्मिकासाठी काही खास नव्हते. कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे तिच्या अनेक सिनेमांचे प्रदर्शन अडकले आहे. शिवाय जून २०२० मध्ये तिच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले.

मनोरंजन क्षेत्रातील मनोरंजक बातम्यांसाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा येथे क्लिक करा…

हेही वाचा
नव्या चित्रपटासाठी राजकुमार रावचा नवा लूक! फिटनेस बघून चाहते म्हणाल कमाल 
फिटनेस फ्रिक प्राजक्ता माळीचे शिवनेरीच्या पायथ्याशी सूर्यनमस्कार, पाहा व्हिडीओ
नागीन फेम आशका गरोडियाचा हवेत केलेला योगा पाहिला नाही तर मग काय पहिलं? नेटकऱ्यांनी देखील केले तोंड भरून कौतुक

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.