Thursday, April 18, 2024

नव्या चित्रपटासाठी राजकुमार रावचा नवा लूक! फिटनेस बघून चाहते म्हणाल कमाल…

बॉलिवूड मध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये अनेक नव्या दमाच्या तरुण अभिनेत्यांनी एन्ट्री मारली. ज्यात आयुष्यमान खुराना, राजकुमार राव, कार्तिक आर्यन यांच्यासारखे अभिनेते आहेत. पाहायला गेलं तर हे तिघेही आजच्या घडीला जुन्या सुपरस्टार्स ना टक्कर देत सामाजिक विषयांवरील समांतर सिनेमे करत आहेत. विशेषतः आयुष्यमान आणि राजकुमार राव! राजकुमार राव बद्दल आजच्या लेखात आपण चर्चा करणार आहोत.

राजकुमार राव हा अत्यंत चलाख, अफाट बुद्धिमत्ता आणि तितकाच वैचारिक कलाकार आहे. राजकुमारने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो विविध नाटकांमध्ये कामं करू लागला आणि २०१० साली त्याचा दीबाकर बॅनर्जी दिग्दर्शित लव्ह,सेक्स और धोका या सिनेमामार्फत त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. यानंतर शाहिद या नावाचा बायोपिकमध्ये मुख्य भूमिका त्याने साकारली. गेल्या अकरा वर्षांमध्ये राजकुमार ने अनेक सिनेमांमध्ये नायक, विनोदी अभिनेता, खलनायक असं अष्टपैलू काम केलं. त्याच्या न्यूटन या सिनेमाला तर त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शाहिद या सिनेमासाठी राज कुमार राव याला २०१४ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या शिवाय राजकुमार ने शादी मे जरूर आना, स्त्री, जजमेंटल है क्या, लुडो यांसारखे भावनाप्रधान तसेच विनोदी भयपटांमध्ये त्याने काम केलं आहे. राजकुमारचा त्याच्या सिनेमांचा एक वेगळा असा चाहतावर्ग आहे.

राजकुमार राव चा बधाई दो हा नवा सिनेमा २०२२ मध्ये आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण पुढील वर्षी जानेवारी पासून सुरू होणार आहे. हा सिनेमा २०१८ साली आलेल्या बधाई हो या सिनेमाचा सिक्वेल असणार आहे. या सिनेमात त्याची भूमिका एक पोलीस अधिकाऱ्याची असणार असून त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत आपल्याला भूमी पेडणेकर हिला पाहता येणार आहे. हा सिनेमा राजकुमार रावसाठी खास असून तो या सिनेमासाठी भरपूर मेहनत घेत आहे. या सिनेमासाठी त्याला त्याची शारीरिक पुनर्बांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे तो तास न् तास जिम मध्ये घालवत आहे. तसे फोटो सुद्धा तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या चाहत्यांसाठी टाकत असतो. गेल्या दोन महिन्यांपासून तो ही मेहनत घेत असून तो सक्त डाएट वर आहे.

या सिनेमात आपल्याला राजकुमार हा फक्त फिटच नव्हे तर त्याच्या ओठांवर आपल्याला मिशी सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्याची केशरचना देखील या सिनेमात आपल्याला अगदी विशिष्ट पद्धतीची पाहायला मिळणार आहे. एकंदरीत या सिनेमात आपल्याला आजपर्यंत कधीही न पाहिलेला राजकुमार पाहायला मिळणार आहे.

Bhumi Pednekar and Rajkumar Rao in Badhaai Do

या सिनेमाची निर्मिती जंगली पिक्चर्स प्रोडक्शन करता असून त्यांनी याआधी तलवार, बरेली की बर्फी, राझी, बधाई हो यांसारख्या सुप्रसिद्ध सिनेमांची निर्मिती केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी करणार आहेत. काय मग आपण राजकुमार चा हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात ना?

हे देखील वाचा