सलमान खानच्या कुटुंबाला कॅटरिनाने दिले नव्हते आमंत्रण, आयुष शर्माने तोडले मौन


कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमध्ये धूम धडाक्यात लग्नाचा बार उडवला. त्यांच्या लग्नाला एक महिना देखील पूर्ण झाला आहे. त्यांच्या लग्नात त्यांनी काही निवडक लोकांना आमंत्रण दिले होते. त्यांनी नेहा धुपिया, अंगद बेदी, कबीर खान तसेच इतर अनेक कलाकारांना त्यांच्या लग्नात बोलावले होते.

सगळ्यांना ही गोष्ट माहित आहे की, सलमान खान (salman khan) आणि कॅटरिना कैफ (katrina kaif) यांचे नाते किती घट्ट होते. ती त्याच्या कुटुंबासोबत देखील मिळून मिसळून राहायची. परंतु तरी देखील कॅटरिनाने तिच्या लग्नाला सलमानच्या कुटुंबाला आमंत्रण दिले नव्हते. या गोष्टीचा खुलासा सलमान खानचा दाजी आयुष शर्माने एका मुलाखतीत केला. त्याने सांगितले की, “विकी कौशलसोबतच्या (vicky kaushal)  लग्नात आमच्या कुटुंबाला आमंत्रण दिले नाही, ही काही मोठी गोष्ट नाहीये.” पुढे तो म्हणाला की, “कॅटरिना आमच्यासाठी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही नेहमीच तिला शुभेच्छा देत असतो. परंतु तिने जर अशाप्रकारे लग्नाचे नियोजन केले होते, तर त्यात काही नवीन गोष्ट नाहीये. तिच्या आणि विकीसाठी हा एक मोठा दिवस आहे. त्या दिवशी दोघांनी आनंदी राहणे जास्त गरजेचे आहे.” (aayush sharma said such a thing when the family was not invited to katrinaand vicky wedding)

आयुषने पुढे सांगितले की, “कॅटरिनाला तिचे प्रेम मिळाले त्यामुळे आमचे कुटुंब खुश आहे. ती नेहमीच एक कुटुंब म्हणून आमच्यासोबत राहणार आहे. आम्ही खुश आहोत की, ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे. लोकांना जेव्हा आनंद मिळतो, तेव्हा ते आशा करतात की, सगळ्यांना त्यांचा आनंद मिळो.”

सलमान आणि कॅटरिनाने अनेक चित्रपटात काम केले आहे. यात ‘पार्टनर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘एक था टायगर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो. कॅटरिना लग्नाच्या आधीच अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या चित्रपटाने देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!