‘लेझी लॅड’ गाण्यावर अभिज्ञा भावेने केला डान्स, दुर्लक्षित करून पती गेला निघून पाहा व्हिडिओ


मराठी टेलिव्हिजनवर काम करून रसिकांच्या मनात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिची खास जागा निर्माण केली आहे. तिची पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. तिचे चाहते देखील तिच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिच्या पतीसोबत एक व्हिडिओ समोर आला आहे.

अभिज्ञाचा पती मेहुल याने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघेही एका ठिकाणी उभे राहिलेले असतात. अभिज्ञाने लाल रंगाची साडी नेसली आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे. ती ‘लेझी लॅड’ या गाण्यावर डान्स करत असते. परंतु त्यावेळी तिचा पती मात्र मोबाईलमध्ये व्यस्त असतो. तो तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि नंतर तेथून निघून जातो. या व्हिडिओचा शेवट खूपच मजेशीर आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Abhidnya bhave’s dance video with her husbund viral on social media)

या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर अभिनेत्री श्रेया बुगडे हिने कमेंट केली आहे की, “आतापर्यंत पहिला सगळ्यात खरी रिल्स.” तसेच आशुतोष गोखले याने हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. तसेच मयुरी देशपांडे हिने देखील हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. तसेच बाकी चाहते तिला बिचारी असे म्हणत आहेत.

अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे.

या मालिकेत ती अर्चनाच्या वहिनीचे म्हणजे मंजुषाचे पात्र साकारत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे. याआधी देखील तिने अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण तरीही तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले आहे. या शोमध्ये तिच्या विनोदी अंदाजाने तिने आख्खा महाराष्ट्राला हसवले आहे.

हेही वाचा :

‘माझी कहाणी फक्त मलाच माहित’, म्हणत रुपाली भोसलेने केला तिचा सुंदर लूक शेअर

मिलिंद गुणाजी यांच्या लेकाचे लग्न झाले थाटात पार, गुणाजी कुटुंबाचे फोटो झाले व्हायरल

‘नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली’, स्वीटूचा स्वीट डान्स व्हिडिओ पाहिलात का?

 


Latest Post

error: Content is protected !!