ऐश्वर्याने आपल्या हनीमून ट्रिपवर केले होते ‘हे’ काम; अभिषेक म्हणाला, ‘ती मला सोडून मिकी अन्…’


बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि शक्तिशाली जोडप्यांपैकी एक मानले जातात. असे म्हटले जाते की, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील जवळीकता ‘गुरू’ या चित्रपटादरम्यान वाढली. या चित्रपटाच्या सेटपासून सुरू झालेली ही मैत्री इतकी वाढत गेली की, हे दोघे एकमेकांच्या कधी प्रेमात पडले हे यांनाही समजले नाही. इतकेच नव्हे, तर या दोघांनी एकमेकांना आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय देखील घेतला.

माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायसोबत ‘गुरू’च्या प्रमोशनसाठी न्यूयॉर्कला गेला, तेव्हा त्याने ऐश्वर्याला प्रपोज केले. याविषयी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, “जेव्हा अभिषेक मला गुडघे टेकून प्रपोज करत होता, तेव्हा मला हॉलिवूड चित्रपटातील दृश्यासारखे वाटले. मला इतका आनंद झाला की हो म्हणायला जास्त वेळ नाही लागला.”

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे २००७ मध्ये लग्न झाले. ऐश्वर्या तिच्या कुटुंबाला विशेष प्राधान्य देते. एका मुलाखतीत अभिषेकने त्याच्या हनीमून ट्रिपबद्दल एक अतिशय मजेदार गोष्ट सांगितली होती. अभिषेकने सांगितले होते की, “मी ऐश्वर्यासोबत डिझनीलँडला गेलो होतो. तिथे ती मला सोडून मिकी आणि मिनीसोबत पोझ देत होती. आम्ही खूप मजा केली होती.”

इतकेच नव्हे, तर अभिषेक बच्चनने त्याच्या ऍनिव्हर्सरीच्या ट्रीपची गोष्टही सांगितली होती. तो ऐश्वर्यासोबत मालदीवला गेला. तेथे त्याने रोमँटिक कँडल लाईट डिनरचे नियोजन केले होते. परंतु वातावरणाने या सर्व प्लॅनवर पाणी फेरले. अभिषेकने सांगितले की, “मी मालदीवच्या बीचवर कँडल लाईट डिनर करणार होता, पण वाऱ्यामुळे मेणबत्ती पुन्हा पुन्हा विझत होती. एवढेच नाही, तर वारा इतका जोरात होता की, अन्नात वाळू येत होती.”

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना एक मुलगी आहे. तिचे नाव आराध्या राय बच्चन असे आहे. ऐश्वर्या तिच्या मुलीकडे पूर्ण लक्ष देते, त्यामुळे ती चित्रपटांमध्येही कमी काम करते. मात्र, ती लवकरच मणिरत्नमच्या ‘पोन्नीयन सेल्वन’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.