Friday, June 14, 2024

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या अभिनेत्याने केले भाजपचे कौतुक; म्हणाला, ‘जय हो…’

4 जून रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरत होते. देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार की आता वेगळी सत्ता येणार? याकडे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली होती. 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या या निकालात भाजपला 240 जागा मिळाल्या, तर NDA ला200 2 जागांवर यश आले. 2024 च्या निवडणुकीच्या या निकालावर अनेक कलाकारांनी सामान्य लोक देखील त्यांचा मत व्यक्त करताना दिसत आहे .अशातच आता एका मराठी अभिनेत्याने देखील पंतप्रधान मोदी यांना यश मिळाल्याबद्दल पोस्ट शेअर.

अभिनेता अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. समाजातील विविध घडामोडींवर तो त्याचे मत ठामपणे मांडताना दिसत असतो. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याने देखील त्याचे मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदीचा फोटो शेअर करून त्याने आनंद व्यक्त केलेला आहे. पंतप्रधान मोदींचा हा फोटो अभिजीत नेहमी इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे.

हा फोटो शेअर करून त्याने “जय हो” असे म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे या पोस्टला त्याने स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो गाणे देखील लावलेले आहे. अभिजीत केळकरने देखील काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्याच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेली आहे. तो प्रचारासाठी देखील उतरला होता. अभिजीत केळकरने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकजण या पोस्टवर त्यांचे मत देखील व्यक्त करत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान
कायदेशीर वादानंतर रणबीरच्या चित्रपटाचे नाव बदलणार, या ‘केरळ स्टोरी’ अभिनेत्रीची एन्ट्री

 

हे देखील वाचा