Thursday, June 13, 2024

साडी नेसून रस्त्यावर भीक मागतोय ‘हा’ अभिनेता? कारण वाचून व्हाल थक्क

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लाल साडी घातलेली महिला दिसत आहे. इतकरच नाही तर ती महिला चौकात उभा राहून सिग्नल पडला की, थांवणाऱ्या गाडीच्या जवळ जाऊन पैसे मागत आहे. या गोष्टी कोण करत हे तुम्हाला देखील माहित आहे. पण तुम्ही समजता तस अजिबात नाही. ही व्यक्ती तृतीयपंथी पण नाही. तर हि व्यक्ती म्हणजे एक अभिनेता आहे. चलातर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता आणि तो असे का करत आहे.

प्रसिद्ध अभिनेता शरद मल्होत्राचा (Sharad Malhotra) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच त्याने केसात गजरा देखील माळला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. शरद ट्रॅफिक सिग्नलवर जातो आणि एका गाडीजवळ जाऊन टाळ्या वाजवू लागतो. कारमधील व्यक्ती त्याला काही पैसे देते. त्यानंतर तो पैसे घेऊन ब्लाउजमध्ये ठेवतो. त्याचा हा अवतार पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.

हा व्हिडिओ शरद मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी रिअल स्पेस आणि वेळेत साकारलेल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आता अल्टवर प्रवाहित होत आहे.” त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, शरदने हा लूक ‘हनी ट्रॅप स्क्वाड’ या मालिकेसाठी केला आहे. या मालिकेत तो डब्बेवाला, सरदार आणि तृतीयपंथी अशा अनेक भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे. शरद ‘बनू में तेरी दुल्हन’, ‘भारत का वीर पुत्र’ आणि ‘कसम तेरे प्यार की’, ‘नागिन 5’ सारख्या शोमध्ये दिसला होता.

अधिक वाचा- 
त्या जातीचं नाव नराधम ! मणिपूरमधील ‘त्या’ खळबळजनक घटनेनंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत
एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी आहे खूपच रंजक, ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’

हे देखील वाचा