बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची बातच निराळी आहे. त्यांचा अंदाज, त्यांची अदब, त्यांची नम्रता आदी अनेक गुण समोरच्याला त्यांच्या प्रेमात पडल्यावाचून राहत नाही. अमिताभ बच्चन यांच्यामध्ये चूक काढणे म्हणजे समुद्रात सुई शोधण्यासारखे आहे. मात्र तरीही माणूस म्हटले की, चूक होतेच. अशीच एक चूक अमिताभ बच्चन यांच्याकडून झाली आहे. त्या चुकीमुळे महानायकाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे.
सगळ्यांनाच माहित आहे की, अमिताभ बच्चन सोशल मीडियावर किती सक्रिय आहेत. ते रोज काही ना काही पोस्ट करतातच. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची त्यांच्या फॅन्सला नेहमीच उत्सुकता असते. मात्र सध्या ते त्यांच्या अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. त्यांचे एक ट्विट त्यांना चांगलेच महागात पडत आहे. सध्या अमिताभ बच्चन यांचे एक जुने ट्विट कमालीचे व्हायरल होत आहे. त्या ट्विटमध्ये बिग बी यांनी लॉन्जरीबद्दल अर्थात महिलांच्या अंतर्वस्त्रांबद्दल एक प्रश्न विचारला आहे. या च ट्विटवर आता नेटकरी त्यांना प्रश्न विचारत ट्रोल करताना दिसत आहे.
T26 -In the English language, why is 'bra' singular and 'panties' plural …
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 12, 2010
सध्या अमिताभ बच्चन यांचे २०१० साली केलेले एक ट्विट कमालीचे व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्विटमध्ये विचारले आहे की, “इंग्लिश भाषेमध्ये ‘ब्रा’ एकवचन तर ‘पॅंटी’ अनेकवचन का आहे?” त्यांच्या याच ट्विटवरून आता त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Good question Bachhan saab try this in next season of KBC https://t.co/8mLhSb24vX
— || (@__d_i_p) July 26, 2023
अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटला एकाने उत्तर देताना लिहिले, “शेवटी कोणतातरी एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे.” दुसऱ्याने लिहिले, “खूपच चांगला प्रश्न बच्चन साहेब याला केबीसीच्या आगामी पर्वात विचारा.” तर अजून एकाने लिहिले, “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.”
Finally someone is asking the important questions! https://t.co/wwFyd5AFez
— Tamkenat (@TamkenatM) July 26, 2023
Didn't expect this???? https://t.co/8ZaCymNSw3
— Anirudh Saxena (@Skinnybadger420) July 26, 2023
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ते लवकरच केबीसीच्या नव्या सुरु होणाऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. त्यांनी केबीसीच्या सेटवरून फोटो देखील शेअर केले आहे. यासोबतच ते लवकरच नाग अश्विन यांच्या ‘कल्कि 2898 एडी’मध्ये दिसणार आहे. त्यांच्यासोबत यात प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा भारतातील सर्वात महाग सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पूजा हेगडेने आत्म’हत्या करण्याचा प्रयत्न केला’, म्हणणाऱ्या युजरवर अभिनेत्रीचा संताप, पाठवली कायदेशीर नोटिस
रेखाला ‘हडळीण’ म्हणत नर्गिसने केलं होतं धक्कादायक विधान; म्हणालेली, ‘ती मर्दांना असे इशारे करायची जसे…’