चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास, बिग बींच्या चित्रपटाचे केले होते दिग्दर्शन


प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक के. व्ही. राजू यांचे शुक्रवारी (२४ डिसेंबर) बंगळुरू येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ते वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. के. व्ही. जयराज यांचे ते धाकटे भाऊ होते. या धक्कादायक बातमीमुळे चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अमिताभ यांच्या ‘इंद्रजित’ चित्रपटाचेही होते दिग्दर्शक
के. व्ही. राजू (K V Raju) यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘इंद्रजित’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. तसेच त्यांनी काजोल आणि जितेंद्र यांचा ‘उधार की जिंदगी’ चित्रपटही दिग्दर्शित केला होता. के. व्ही. राजू हे कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रतिभावान दिग्दर्शक होते, त्यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

‘या’ चित्रपटांचे केले दिग्दर्शन
के. व्ही. राजू यांनी १९८२ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. राजू यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून १९८४ मध्ये ‘ओलेव बडुकू’ या चित्रपटाद्वारे करिअरला सुरुवात केली. ‘युद्धकंडा’, ‘बेली मोदगालु’, ‘इंद्रजित’, ‘कड़ाना’, ‘बेली कलुंगारा’, ‘हुलिया’ हे त्यांचे काही उत्कृष्ट चित्रपट आहेत.

के. व्ही. राजू यांनी ८० आणि ९० च्या दशकात ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन कन्नड चित्रपट उद्योगात खळबळ निर्माण केली होती. त्यांनी बहुतेक सर्व कन्नड सुपरस्टार्ससोबत काम केले. अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्या ‘इंद्रजित’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!