×

अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर करत चाहता म्हणाला, ‘थकल्यासारखे दिसत आहे’, बिग बींनी दिले भन्नाट असे उत्तर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. अमिताभ हे अशा कलाकारांपैकी एक आहेत ज्यांना या वयात त्यांच्या कामासह सोशल मीडियाचा आनंद घेणे आवडते. ते स्वत:शी निगडित खास घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर ‘बाहुबली’ स्टार प्रभासचे जोरदार कौतुक केले होते. ते अनेकदा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. अमिताभ यांना त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे आवडते. त्याचमुळे त्यांचा सोशल मीडियावर जास्त वावर पाहायला मिळतो. यासोबतच ते चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील देतात.

बिग बी सध्या बॉलिवूडपासून साऊथपर्यंत काम करत आहेत. सध्या तो बाहुबली प्रभाससोबत (Prabhas) एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान, अमिताभ यांचे एक उत्तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका चाहत्याने त्यांचा एक फोटो शेअर करत काहीतरी विचारले आणि त्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर बॉलिवूड सुपरस्टारचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बिग बी खूपच थकलेले दिसत आहेत. या फोटोसोबत या चाहत्याने लिहिले आहे की, “खूप थकल्यासारखे दिसत आहे.” अमिताभ बच्चन यांनीही या ट्वीटला उत्तर देत लिहिले, “नो स्लीप क्लब… तुझी नजर जॅकेटवरील पॅचवर गेली नाही.” अशातच त्यांचे हे ट्वीटही खूप वाचले जात आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर एक मोठी यादी आहे. सध्या अमिताभ बच्चन प्रभाससोबत साऊथमध्ये शूटिंग करत आहेत. याशिवाय त्याचा ‘झुंड’ सिनेमाही प्रदर्शनाच्या तयारीत आहे. इतकेच नाही, तर ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्येही दिसणार आहे. याशिवाय अमिताभ यांच्याकडे ‘रनवे ३४’ आणि ‘झुंड’ हे चित्रपटही आहेत.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post