Saturday, July 6, 2024

‘गोडसे’ वादाच्या भोवऱ्यात! ‘कोण आहेत महेश मांजरेकर?’, म्हणत गृहनिर्माण मंत्र्यांनी ओढले अस्तित्वावर ताशेरे

‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या आगामी ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी या चित्रपटाचा एक पोस्टर व्हिडिओ शेअर केला आहे. ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा करताच चित्रपट आणि अभिनेते वादाच्या कचाट्यात सापडले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकरांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत म्हटले आहे की, “कोण आहेत महेश मांजरेकर? भारतीय सिनेसृष्टीसाठी त्यांचे काय योगदान आहे? लोकांचं लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारे नाटक सुरू आहे.”

महेश मांजरेकरांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “नथुराम गोडसेची गोष्ट कायमच माझ्या हृदयाजवळ राहिली आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांना पाठिंबा देणे हे खूप धाडसाचे काम आहे. कठीण विषयामध्ये सत्य सांगताना कधीच हयगय करायची नाही या विचारावर मी आधीपासून ठाम आहे. गोडसेबद्दल तो गांधीजींचा मारेकरी आहे या पलीकडे कुणालाच काहीच माहिती नाही. कोण चूक, कोण बरोबर यावर आम्ही काहीच भाष्य केले नाही. हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा आहे.”

महेश मांजरेकर यांना या चित्रपटामधून गोडसेचे आयुष्य दाखवायचे आहे. या चित्रपटामध्ये गोडसे विषयी चांगल्या गोष्टी दिसणार असल्याची अनेकांनी शक्यता व्यक्त केली आहे. परंतु राजकारण्यांनी यावर स्वतःचे मत मांडले आहे. त्यामुळे आता ‘गोडसे’ चित्रपटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महेश मांजरेकर यांनी आजवर सिनेसृष्टीमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. त्यांनी ‘जय हो’, ‘वृंदावन’, ‘संजू’, ‘मर्द को दर्द नही होता’, ‘दबंग ३’, ‘द पावर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. ते एक उत्तम दिग्दर्शक देखील आहेत. आजवर त्यांनी ‘कृतिक्षेत्र’, ‘निदान’, ‘पिता’, ‘रक्त’, ‘लालबाग परळ’, ‘कुटुंब’, ‘प्यार किया नही जाता’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा