Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘डाॅक्टर जी’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज; आयुष्मान, रकुल प्रीतच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना लावले वेड

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाहा त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची नेहमीच मने जिंकतो. आयुष्मान खुरानाचा बहुप्रतिक्षित ‘डॉक्टर जी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशातच या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. ‘हर जग तू’ या रोमँटिक गाण्यात आयुष्मान खुराना रकुल प्रीत सिंगवर आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. मेडिकल कॉलेजमध्ये दोन तरुणांचं प्रेम कसे फुलते हे गाण्यातून दाखवण्यात आले आहे.

‘हर जगह तू'(Har Jagah Tu ) या गाण्याला सुल्तान सुलेमानी कंपाेज केलं आहे तर गाण्याचे बाेल कुमारने लिहिले आहे. चित्रपटात आयुष्यमान (Ayushmann Khurrana) डाॅ. उदय गुप्ताची भूमिका साकारत आहे. त्याला डाॅ. फतिमा सिद्दीकीची भूमिका साकारणाऱ्या रकुल प्रीत सिंग (Rakul preet singh) हिच्यावर क्रश असताे. म्यूजिक व्हिडिओच्या सुरुवातीला उदय फातिमाला सांगत आहे की,”त्यांच्या जवळच्या भागात मुलं क्रिकेट खेळतात तर मुली बॅडमिंटन खेळतात. कारण काही गाेष्टी मुलींना सुट करत नाही.”

उदय संपुर्ण गाण्यात फतिमा साेबत दिसत आहे. हे गाणं राज बर्मनने गायलेलं आहे. उदयने मुलांच्या बॅडमिटंन न खेळण्याच्या कमेंटवर फतिमाला माफी मागत आहे आणि यानंतर दाेघे लव साॅंगगध्ये काही राेमॅंटिक क्षण घालवताना दिसत आहे. ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट जंगली पिक्चर प्राेडक्शनमध्ये बनला आहे.

महिलांनी भरलेल्या वर्गात आयुष्यमान एकमात्र पुरुष डाॅक्टर असल्यानं चांगलाच अडचणीत येत आहे. शेफाली शाह चित्रपटात शिक्षिका आहे. तर शीबा चढ्ढा त्याच्या आईच्या भूमिकेत आहे. गाण्याला पाच लाखाहून अधिक व्हयूज आले आहेत. लाेक राज बर्मन यांच्या आवाजाची स्तुति करत आहे. गाण्याचे बाेल चाहत्याच्या पसंतीस उतरले आहे.

सिनेमागृहात 14 ऑक्टाेंबरला प्रदर्शित हाेणार चित्रपट
सुमित सक्सेना, सौरभ भारत, विशाल वाघ आणि अनुभूति कश्यप यांच्या द्वारा लिखित हा चित्रपट 14 ऑक्टाेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. ‘हर जग तू’ हे चित्रपटात पहिल रिलीज झालेल गाणं आहे. चित्रपटात ‘वह लड़की है कहां’, ‘डोसा किंग’ आणि ‘क्लिक शंकर’ सारखे गाणं पुढच्या आठवड्यात रिलीज हाेणार आहे.

हे देखील वाचा