‘माझ्या खासगी अवयवांना स्पर्श केला, फोनवर धमकी दिली’, प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप


टीव्ही मालिका ‘सेक्स अँड द सिटी’ फेम अभिनेता ख्रिस नॉथ अडचणीत आला आहे. गायिका लिसा जेंटाइलने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लिसाने पत्रकार परिषदेत तिच्यासोबत घडलेल्या या घटनेचा खुलासा केला आहे. तिने असेही सांगितले की, ख्रिस नॉथने तिचे करिअर बरबाद करण्याची धमकी देखील दिली होती.

दिली करिअर बर्बाद करण्याची धमकी
माध्यमांतील वृत्तानुसार, लिसाने (Lisa Gentile) सांगितले की, ख्रिस नॉथने (Chris Noth) तिला बळजबरीने किस केले होते. यासोबतच तिच्या खासगी स्तनांनाही स्पर्श केला होता. यादरम्यान तिने ख्रिसला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने तिचे काहीच ऐकले नाही. या घटनेनंतर ख्रिसने तिला फोन करून धमकी दिल्याचा दावाही लिसाने केला. लिसाच्या म्हणण्यानुसार, ख्रिसने तिला सांगितले की, “जर मी काल रात्री याबद्दल कोणाला सांगितले, तर तो माझे करिअर खराब करेल. मी पुन्हा कधीही गाणे गाऊ शकणार नाही आणि त्याने मला इंडस्ट्रीत काळ्या यादीत टाकण्याची धमकीही दिली.”

अशी झाली दोघांची मैत्री
लिसाने ख्रिससोबतच्या तिच्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितले. ख्रिससोबत तिची पहिली भेट १९९८ मध्ये न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. ख्रिस हा त्या रेस्टॉरंटचा नियमित ग्राहक होता. लिसा आणि ख्रिस संगीत-व्यवसायावर खूप बोलायचे. त्यामुळे दोघेही चांगले मित्र बनले होते. २००२ मध्ये एकदा ख्रिसने लिसाला त्याच्या घरी सोडण्यास सांगितले, ज्याला तिने सहमती दिली. जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा ख्रिसने लिसाला वर येण्यास विचारले.

ख्रिसने जबरदस्तीने लिसाची घेतली किस
लिसा सांगते की, “मी घरात पोहोचताच ख्रिस नॉथने मला किस करायला सुरुवात केली. त्याने मला त्याच्याकडे खेचले, ज्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. मी त्याच्यापासून दूर जात होते, पण तो मला पुन्हा पुन्हा खेचत होता. मी कशीतरी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि म्हणाले, मला हे करायचे नाही.”

ख्रिसने फोन करून लिसाला धमकावले
लिसाने सांगितले की, ख्रिस खूप चिडला होता. दुसर्‍या दिवशी ख्रिसने तिला फोन केला आणि काल रात्रीची घटना कोणाला सांगू नकोस अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी दिली. लिसा म्हणाली की, ख्रिस नॉथच्या विरोधात आवाज उठवायला तिला खूप भीती वाटत होती की, तो तिचे करियर खराब करेल.

महत्वाचे म्हणजे, लिसाच्या आधी हॉलिवूड इंडस्ट्रीतील चार महिलांनी ख्रिस नॉथवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!