Friday, April 26, 2024

“मी कितीही चांगले सिनेमे केले, तरीही अनिल कपूरचा मुलगा असल्याने लोकं करतात माझा राग राग”

बरेच लोक अनेकदा स्टार्स किड्सवर त्यांना या मनोरंजनाच्या दुनियेत मिळणाऱ्या सहज प्रवेशाबद्दल त्यांचा राग व्यक्त करताना आपण पहिले आहे. नेपोटिझम हा सर्वांसाठीच कळीचा मुद्दा बनला आहे. मात्र, आपण जर पाहिले, तर असे अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांना भलेही त्यांच्या घराण्याच्या नावावर किंवा आई- वडिलांच्या नावावर या क्षेत्रात प्रवेश मिळाला आहे. असे असले, तरीही त्यांना यश काही मिळाले नाही. यातलाच एक अभिनेता म्हणजे हर्षवर्धन कपूर. अनिल कपूर यांचा लेक असलेल्या हर्षवर्धन कापूरनेही वडिलांच्या आणि बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र, हर्षवर्धनला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही तो या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मात्र, असे असूनही अनेक लोकांना तो आणि त्याचे हे प्रयत्न आवडत नसल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तो या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाला, “मी माझ्या स्वतःसाठी कमर्शियल चित्रपटांचा मार्ग न निवडता पठडीबाहेरील चित्रपट करायला प्राधान्य देतो. मी असे सिनेमे करतो जे आपल्या सामान्य चित्रपटांपेक्षा वेगळे आणि मीडियाचा टच नसलेले असतात. मी माझे काम करतो. मला ओळखणाऱ्या सर्व लोकांना माझे काम आणि मला काय पाहिजे, काय आवडते हे माहित आहे. कदाचित म्हणून काही लोकांना मी आवडतो. मी माझ्या आयुष्यात कितीही चांगले काम केले, चांगले सिनेमे केले, तरीही काही लोकं फक्त मी अनिल कपूरचा मुलगा असल्याने माझा राग राग करतात. आता याला मी काहीच करू शकत नाही. यासर्व गोष्टींमध्ये मी शांतता शोधत असतो.”

स्वतःबद्दल बोलताना हर्षवर्धन म्हणाला, “मी खूपच बोरिंग आहे. यामुळेच माझी कोणतीही गर्लफ्रेंड नाही. मी मीडियासमोर फक्त माझ्या कामापुरतेच येतो. त्यानंतर मला मीडियासमोर यायला आवडत नाही. मला माझे खासगी आयुष्य खूप प्रिय आहे. मी जेव्हा चित्रपट करतो, तेव्हाच मीडियासमोर येऊन चित्रपटाबद्दल बोलेल आणि त्यानंतर गायब होईल.”

हर्षवर्धनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच वडील अनिल कपूरसोबत अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. त्याने ‘मिर्झिया’ सिनेमातून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तो ‘भावेश जोशी सुपरहीरो’ सिनेमातही दिसला होता. अनिल कपूर यांच्या ‘एके वर्सेज एके’मध्ये त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘रे’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा