Tuesday, September 26, 2023

अर्रर्र! सुट्ट्यांवर गेला अन् शरीरासोबत ‘हे’ काय करून बसला ऋतिक? गर्लफ्रेंड म्हणाली, ‘प्लीज तू जास्त…’

अभिनय म्हणा, डान्स म्हणा किंवा फिटनेस, या तिन्ही विभागात आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये ऋतिक रोशन याचाही समावेश होतो. ऋतिक नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अलीकडे, तो त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मात्र, सोशल मीडियावर तो त्याच्या फिटनेसमुळेच चर्चेत असतो. वयाची पन्नाशी गाठणाऱ्या ऋतिकचा फिटनेस चाहत्यांना हादरून सोडतो. मात्र, तो सध्या सुट्टीवर गेला असल्याने त्याची फिटनेस पूर्वीप्रमाणे दिसत नाहीये. त्याने सुट्ट्यांमध्ये डाएट पाळले नाही. त्यामुळे त्याचे वजन वाढले आहे. याचा काय परिणाम झाला, हे त्याने आधीचा आणि नंतरचा फोटो शेअर करून स्वत:च सांगितले आहे.

ऋतिक रोशन इंस्टाग्राम
सुपरस्टार ऋतिक रोशन इंस्टाग्राम (Hrithik Roshan Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकतेच इंस्टावर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत तो खूपच फिट दिसत आहे. हा फोटो व्हॅकेशनवर जाण्यापूर्वीचा आहे, तर दुसऱ्या फोटोत त्याचे वजन खूपच वाढल्याचे दिसत आहे. हा फोटो व्हॅकेशननंतरचा आहे. दोन्ही फोटोतील फरक स्पष्टपणे दिसत आहे.

हे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले की, “व्हॅकेशन संपले, आधीचा आणि आताचा फोटो, जिममध्ये भेटूयात.” यावरून स्पष्ट होते की, फिटनेस फ्रीक ऋतिक आता जिममध्ये घाम गाळून पुन्हा आधीसारखी फिटनेस मिळवणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिकच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. या फोटोला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 9 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. या फोटोवर चाहत्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता अनिल कपूर याने हार्ट इमोजीचा समावेश करत कमेंट केली की, “अविश्वसनीय.” तसेच, गर्लफ्रेंड सबा आझादने लिहिले की, “नंतर!!! प्लीज जास्त चीज खा.” अभिनेत्री प्रीती झिंटा हिनेही कमेंट करत लिहिले की, “व्वा.”

सबासोबतच्या नात्यामुळे चर्चेत
ऋतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेमात आहे. तो त्याच्या नात्याचा मोकळेपणाने आनंद घेत आहे. मागील वर्षीपासून सबा आझाद (Saba Azad) हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जात आहे. तसेच, मागील काही महिन्यांपासून हे स्पष्ट झाले आहे की, ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. वृत्तांनुसार, सबा ही रोशन कुटुंबाच्या खूपच जवळ आहे. तसेच, दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकू शकतात.

ऋतिकच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर अभिनेता आगामी ‘फायटर‘ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 25 जानेवारी, 2024 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. (Actor hrithik roshan share before and after pics actor caption it see you in the gym)

महत्त्वाच्या बातम्या-
अखेर ‘Gadar 2’ने 300 कोटींचा आकडा पार केलाच, 8व्या दिवशी सिनेमाने केली तगडी कमाई
दु:खद! Heart Attackमुळे ‘या’ अभिनेत्याचे 25व्या वर्षी निधन, मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा