भारीच ना! जॅकी श्रॉफ अन् सुनील शेट्टीने ‘झांझरिया’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; माधुरी दीक्षितही झाली इम्प्रेस


टीव्हीवर असे अनेक रियॅलिटी शो आहेत, जे शोमार्फत आपल्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतात. यातीलच एक डान्स रियॅलिटी शो म्हणजे ‘डान्स दीवाने ३’ होय. या शोचे निर्माते आपल्या शोमध्ये नेहमीच काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना शोमध्ये आमंत्रित करतात आणि तेदेखील आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. डान्स दीवाने ३ च्या शनिवारी (३ जुलै) झालेल्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी एकत्र मिळून शोची परीक्षक माधुरी दीक्षितला इम्प्रेस करण्यासाठी जोरदार ठुमके लावले होते. (Actor Jackie Shroff Suniel Shetty Madhuri Dixit Dance Goes To Viral On Dance Deewane Set)

या शोच्या प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये एकीकडे जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी माधुरीला इम्प्रेस करण्यासाठी ‘झांझरिया’ गाण्यावर डान्स केला. दुसरीकडे जग्गू दादा म्हणजेच जॅकी यांनी माधुरीसोबत देव आनंद यांच्या गाईड चित्रपटातील ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ गाण्यावर डान्स केला. या परफॉर्मन्सदरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी होती.

सुनील आणि जॅकी यांच्यासोबत धर्मेश, राघव, तुषार आणि माधुरीने ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटातील ‘ऐ मेरी जोहराजबीं’ गाण्यावर विचित्र डान्सही केला. यादरम्यान माधुरी राघव सोडून सर्वांकडे माईक घेऊन जात होती. हा परफॉर्मन्स खूपच मनोरंजक होता.

विशेष म्हणजे यापूर्वीही शोमध्ये अभिनेत्री रवीना टंडनने हजेरी लावली होती. यादरम्यान पडद्यावरील दोन मोठ्या अभिनेत्री म्हणजेच रवीना आणि माधुरीने एकत्र डान्स केला होता. यादरम्यान सर्व चाहत्यांना खरी मजा तर तेव्हा आली, जेव्हा रवीनाने माधुरीच्या आणि माधुरीने रवीनाच्या गाण्यावर ठुमके लावले होते.

सर्वप्रथम माधुरीने ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर रवीनाने माधुरीचे हिट गाणे ‘धक धक करने लगा’वर जोरदार ठुमके लावले होते. यानंतर दोघींनीही ‘अखियों से गोली मारे’ या गाण्यावर डान्स केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.