Thursday, April 18, 2024

काजल अग्रवाल अन् गौतम किचलूने दिली गोड बातमी, शेअर केली नव्या पाहुण्याची पहिली झलक

बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालच्या गर्भधारणेची माहिती बऱ्याच काळापासून समोर येत आहेत. मात्र, काजलने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. काजलने तिचा बॉयफ्रेंड गौतम किचलूबरोबर २०२० मध्ये लग्न केले आहे. आता तिच्या घरी एक लहान पाहुणा आला आहे. ज्याची माहिती तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहे. मात्र, त्यासोबत एक ट्विस्ट देखील आहे.

काजल अग्रवालच्या घरी आला छोटा पाहुणा
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनी ते आई बाबा झाले असल्याचा आनंद चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरी एक पेट डॉग आले आहे. त्याच नाव त्यांनी ‘मिया’ ठेवले आहे. काजल अग्रवाल आणि गौतम किचलूनेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मियाचे फोटो शेअर करत लिहिले की, “पहिले मूल, शेवटी काजल अग्रवालला मनवले. वेलकम मिया पपी.”

काजलला आहे डॉग फोबिया
तिच्या कुत्र्याचा एक गोंडस फोटो शेअर करत काजलने लिहिले की, “माझ्या कुटुंबातील नवीन सदस्याची ओळख करून देत आहे, लिटल मिया. जो कोणी मला ओळखतो त्याला माहित आहे की, मला लहानपणापासून कुत्र्यांचा फोबिया आहे. दुसरीकडे, गौतम हा डॉग लव्हर आहे. पाळीव प्राण्यांसह मोठा झाला आहे आणि खऱ्या जोडीदाराचा अर्थ समजून घेतला आहे. आयुष्य आपल्याला सर्वसमावेशक आणि प्रेम पसरवायला शिकवते. मिया आमच्या आयुष्यात खूप मस्ती आणि उत्साह घेऊन आली आहे. हा प्रवास कसा असेल हे पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही.” काजलचे चाहते तिची ही पोस्ट खूप पसंत करत आहेत.

https://www.instagram.com/p/CUSzWavstpn/?utm_source=ig_web_copy_link

‘फिल्म द घोस्ट’मध्ये दिसणार नाही
काजलच्या गर्भधारणेची माहिती समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ती नागार्जुन सोबत ‘फिल्म द घोस्ट’मध्ये दिसणार नाही. तिची जागा जॅकलिन फर्नांडिसला अप्रोच केली जात आहे. काजल या चित्रपटाचा भाग नसल्याची कोणतीही अधिकृत पुष्टी केली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, काजल ज्या प्रोजेक्टर काम करत होती ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा