Monday, October 2, 2023

मराठमोळी गायिका आनंदी जोशी अडकली लग्नाच्या बेडीत, गायकासोबतच थाटला संसार; पाहा फोटो

संगीतविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘मन धागा धागा’, ‘मन माझे’ आणि ‘कुणी येणार गं’ यांसारख्या प्रसिद्ध मराठी गाण्यांना आवाज देणारी गायिका आनंदी जोशी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. विशेष म्हणजे, आनंदी जोशी हिने ज्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधली आहे, तो व्यक्तीही गायकच आहे. आनंदीने गायक जसराज जोशी याच्यासोबत संसार थाटला आहे. आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) सोशल मीडियाद्वारे लग्नाची माहिती दिली.

मागील काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या आनंदी जोशी आणि जसराज जोशी (Aanandi Joshi And Jasraj Joshi) यांनी आपल्या नात्याला नवीन नाव दिले आहे. आनंदी आणि जसराज आता पुढील आयुष्य पती-पत्नी म्हणून घालवणार आहेत. या गायक जोडप्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाची माहिती दिली. त्यांनी कोलॅब पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “अत्यंत आदराने, आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी नम्र विनंती करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aanandi Joshi (@aanandijoshi)

अभिनंदनाचा वर्षाव
चाहत्यांव्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने कमेंट करत लिहिले की, “व्वा अभिनंदन गाईज.” गायक सलील कुलकर्णी यांनीही लिहिले की, “तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि खूप खूप आशीर्वाद.” तसेच, अभिनेत्री श्रेया बुगडे हिनेदेखील कमेंट करत लिहिले की, “अभिनंदन डार्लिंग.”

प्रसिद्ध मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे यानेही लव्ह इमोजी कमेंट करत लिहिले की, “अभिनंदन.” याव्यतिरिक्त गायिका सावनी रवींद्र, अभिनेत्री स्पृहा जोशी, अश्विनी कासार यांनीही नवदाम्पत्याचे अभिनंदन केले.

आनंदी जोशी आणि जसराज जोशींची गाणी
आनंदी 32 वर्षांची असून तिने अनेक हिट मराठी गाणी गायली आहेत. आनंदीने ‘मन धागा धागा’, ‘अगं ऐक ना’, ‘आनंदघन’, ‘गरा गरा’, ‘जानू जानू’ यांसारखी गाणी गायली आहेत. तसेच, जसराज जोशी यानेही अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यात ‘जीव पिसाटला’, ‘मोरया रे’, ‘तू आहेस ना’, ‘पार्टी शार्टी’, ‘रख हिंमत’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल 20 वर्षांपासून आपल्या वडिलांना भेटली नाही ‘वेड’ फेम जिया शंकर; जगापुढे मांडल्या वेदना; म्हणाली…
मोठी बातमी! बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला 6 महिन्यांचा तुरुंगवास, ठोठावला ‘एवढ्या’ रुपयांचा दंड

हे देखील वाचा