Friday, March 29, 2024

लता मंगेशकर यांनी ठेवले होते ‘नील’ नितीन मुकेशचे नाव, पहिल्यांदा पाहिल्यानंतर गायिकेने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अभिनेता नील नितीन मुकेशने (Neil Nitin Mukesh) त्याच्या कारकिर्दीत काही चित्रपट केले आहेत. ज्यात त्याचे आणि त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले. एका प्रसिद्ध संगीत कुटुंबात जन्मलेल्या नीलने चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. मात्र चांगली कामगिरी करूनही त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. आजही तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या घरासाठी, कुटुंबासाठी आणि बॅकग्राऊंडमुळे जास्त प्रसिद्ध आहेत. नील शनिवारी (१५ जानेवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

लता मंगेशकर यांनी ठेवले होते नाव
गायक नितीन मुकेश यांचा मुलगा आणि ज्येष्ठ गायक मुकेश यांचा नातू नीलचा जन्म १५ जानेवारी १९८२ मध्ये झाला. तेव्हा चित्रपटसृष्टीतील सर्व मोठे कलाकार त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. असे म्हटले जाते की, अभिनेत्याच्या आजूबाजूला सूर संगमचे आवाज होते. यादरम्यान गायिका लता मंगेशकर यांनी नीलला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या की, “तो ब्रिटिशांसारखा गोरा आहे. त्याचे नाव नील ठेवा.” त्यावेळी चंद्रावर पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग चर्चेत होता, म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीतील कोकिळाने नीलला हे नाव दिले होते.

१९८९मध्ये बालकलाकार म्हणून केले पदार्पण
नीलने ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. जरी त्याने १९८९ मध्ये चित्रपटांमध्ये पदार्पण केले असले, तरी असे म्हटले जाते की, वयाच्या ७ व्या वर्षी नीलने अभिनेता गोविंदाच्या सुपरहिट चित्रपट ‘जैसी करनी वैस भरनी’मध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटात नीलने अभिनेता गोविंदाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

खलनायक म्हणून मिळाली ओळख
नीलने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आ देखो जरा’, ‘जेल’, ‘लफंगे परिंदे’, ‘प्लेयर’ आणि ‘३जी’ यासह अनेक चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला आहे. मात्र, नील नितीन मुकेशला ‘वजीर’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘साहो’ या चित्रपटांतून खलनायक म्हणून ओळख मिळाली. नीलने हीरो नव्हे, तर खलनायक बनून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

नीलची एकूण संपत्ती ६ मिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. नीलला व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळतो. त्याचवेळी त्याला एका चित्रपटासाठी २-३ कोटी मिळतात. नीलचे स्वतःचे काही ब्रँड्स देखील आहेत आणि त्यासोबतच तो जाहिरातींमधूनही कमाई करतो. नील ११.३ कोटींच्या आलिशान घरात कुटुंबासोबत राहतो. तो मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, जाग्वार आणि ऑडीमध्ये प्रवास करतो.

लग्नापूर्वी त्याचे नाव फॅशन डिझायनर प्रियांका भाटिया, दीपिका पदुकोण यांच्यासोबतही जोडले गेले होते. ‘लफंगे परिंडे’मध्ये नील दीपिका पदुकोणच्या सोबत दिसला होता. चित्रपटादरम्यान त्यांची जवळीक वाढली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नील नितीन मुकेश नोव्हेंबर २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘बायपास रोड’ चित्रपटात शेवटचा दिसला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा