‘चांगला उपचार मिळाला असता, तर मी वाचलो असतो’, मरण्यापूर्वी अभिनेत्याने लिहिलेली फेसबुक पोस्ट चर्चेत

Actor Rahul Vohra Dies Hours After Sharing Helpless Facebook Post Seeking Better Treatment


कोरोना व्हायरसच्या काळात दिवसेंदिवस अनेकजण आपला जीव गमावताना दिसत आहेत. या व्हायरसने तर कलाकारांनाही सोडले नाही. अनेक कलाकारांनीही यादरम्यान जगाचा निरोप घेतला आहे. आता अशातच आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. दीर्घकाल कोरोना व्हायरसशी लढा दिल्यानंतर शेवटी अभिनेता राहुल वोहराचे निधन झाले आहे. याची पुष्टी थिएटर दिग्दर्शक आणि प्ले रायटर अरविंद गौहर यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. राहुलने शनिवारी (८ मे) फेसबुकवर एक मेसेज करून लोकांना मदतीचे आवाहन केले होते.

अनफ्रीडममध्ये केले होते काम
कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राहुलची तब्येत बिघडली होती. उत्तराखंडमधील राहुल डिजिटल प्लॅटफॉर्मवरील एक प्रसिद्ध चेहरा होता. तो नेटफ्लिक्सवरील सीरिज ‘अनफ्रीडम’मध्ये दिसला होता. राहुलच्या कामाला चांगलीच पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे मरण्यापूर्वी लिहिलेली राहुलची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामध्ये त्याने लिहिले होते की, त्यालाही चांगला उपचार मिळाला असता, तर तो वाचला असता.

‘मला वाचवले जाऊ शकले असते’
अभिनेत्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहित म्हटले होते की, “मलाही चांगला उपचार मिळाला असता, तर मी वाचलो असतो. तुमचा राहुल वोहरा.” एक रुग्ण म्हणून त्यानेे आपली माहिती या पोस्टमध्ये लिहिली होती.

त्याने लिहिले होते की, “लवकरच जन्म घेईल आणि चांगले काम करेल. आता मी खूप तुटलो आहे.” अरविंद यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुलच्या निधनाची बातमी दिली आणि शोकही व्यक्त केला.

आम्ही तुझे मारेकरी आहोत
अरविंद यांनी लिहिले की, “राहुल वोहरा मेला नाही. माझा प्रतिभावान कलाकार आता या जगात नाही. कालचीच गोष्ट आहे, जेव्हा त्याने मला त्याने मला सांगितले की, त्याला चांगला उपचार मिळाला असता, तर त्याचा जीव वाचवला जाऊ शकला असता. त्याला आयुषमान द्वारकामध्ये शिफ्ट केले होते. परंतु आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. कृपया आम्हाला माफ कर राहुल. आम्ही तुझे मारेकरी आहोत. पुन्हा एकदा तुझ्याप्रती सन्मान व्यक्त करतो.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.